crimesocialsolapur

✍🏻Speed news:- शहर गुन्हे शाखेकडून ४ मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस…

३ आरोपींना अटक...

सोलापूर

दिनांक ०३/०८/२०२४ रोजी, सपोनि / जीवन निरगुडे व त्यांचे तपास पथक पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर हद्दीमध्ये गस्त करीत असताना, खात्रीशिर बातमी मिळाली की, अभिलेखावरील सराईत आरोपी नामे- नागेश भीमाशंकर पाटील वय ३६ वर्षे, व्यवसाय मजुरी, राहणार- चनशट्टी अपार्टमेंटच्या बोळामध्ये घोंगडे वस्ती, सोलापूर यास सहत्रार्जुन वैकुंटधाम स्मशान भुमी ते पसारे वस्तीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर, सोलापूर या ठिकाणी चोरीची मोटार सायकल विक्रीकरीता घेवून येणार असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती. प्राप्त बातमीनुसार, सहत्रार्जुन वैकुंटधाम स्मशान भुमी ते पसारे वस्तीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर, सोलापूर या ठिकाणावरून, सराईत आरोपी नामे नागेश भिमाशंकर पाटील यास, त्याचे ताब्यातील मोटारसायकलसह ताब्यात घेतले.

त्यावेळी त्याच्याकडे नमूद मोटार सायकल बाबत अधिक विचारपूस केली असता, त्याने
१) हंडे प्लॉट, जुना पुना नाका सोलापूर या ठिकाणावरुन सुझुकी एक्सेस,
२) मार्केट यार्ड सोलापूर या ठिकाणावरुन CD Delux

३) संजीवणी बिअर बार जवळ मड्डी वस्ती, भवानी पेठ येथुन हिरो होंडा स्प्लेंडर अशा ०३ मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली.

तसेच दिनांक ०८/०८/२०२४ रोजी, एक इसम चोरीची मोटार सायकल घेऊन, किडवाई चौक, सोलापूर या ठिकाणी येणार असल्याची गोपनिय माहिती प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने, सपोनि / जीवन निरगुडे व त्यांचे तपास पथक असे, प्राप्त माहितीच्या आधारे, सुल्तान कैंटीन, किडवाई चौक, सोलापूर या ठिकाणी सापळा रचुन इसम नागे रवि लक्ष्मण मनसावाले वय ३७ वर्षे, राहणार २८ लक्ष्मी नारायण टॉकिज जवळ, आदर्श नगर, कुंभारी नाका, सोलापूर यास, संशयीत विना नंबर प्लेट मोटार सायकल सह ताब्यात घेतले. त्यानंतर त्याचेकडे अधिक विचारपूस केली असता त्याने, सदरची मोटार सायकल त्याचा साथीदार नामे आकाश बजरंग बौधरी, रा. घर नं-१/२, बेडर पूल, उत्तर सदर बझार, सोलापूर याचेसह, २०,०००/- रूपये किंमतीची एच.एफ. डीलक्स कंपनीची मोटार सायकल क्रमांक एम.एच. १३ सी. एफ. ६१९५ ही, बालाजी मंगल कार्यालय, जुळे सोलापूर ठिकाणावरुन चोरी केल्याची कबुली दिली. त्याप्रमाणे, विजापूर नाका पोलीस

ठाणे गु. र. क्र- २९५/२०२२ भा. द. वि.स. कलम ३७९ अन्वये, दाखल गुन्हा उघडकीस आला आहे. अशा प्रकारे वरील नमुद ०३ आरोपींकडुन ९०,०००/- रुपये किंमतीच्या ०४ चोरीच्या मोटार सायकली,

हस्तगत करून, ०४ गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कामगिरी  एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. राजन माने, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. सुनिल दोरगे, व.पो.नि., गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली, सपोनि/जीवन निरगुडे पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, वाजीद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, यांनी केली आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button