maharashtrapoliticalsocialsolapur

सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा सामाजिक कार्यकर्ते पै.माऊली हेगडे..

.

 

सोलापूर

जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा पै.माऊली हेगडे यांनी मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सोलापूर जिल्ह्यात मागील दहा दिवसांपासून अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावस सुरू आहे.एका दिवसात कुठे १३१ तर कुठे १४९ मिली मीटर पावसाची नोंद झालीय.
परिणामी जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्याने शेतीपिकांचे मोठ नुकसान झाले आहे.त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी पै.माऊली हेगडे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

 

 

 

सोयाबीन, उडीद, मूग, मटकी, तूर यासारख्या कडधान्याबरोबरच ऊस, मका, कांदा व इतर पिके पाण्याखाली जाऊन मोठ नुकसान झालं आहे.अनेक ठिकाणी शेती अक्षरशः भुईसपाट झाली आहे.यामुळे जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.शेती पिकांना हमीभाव नसल्याने मिळेल त्या भावाला शेतीमाल विकून उपजीविका चालवणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर पिढ्यान् पिढ्या कर्जाचा डोंगर आहे.

 

 

 

शेतकऱ्याला शेती परवडेणा अशी झालीय मात्र वडिलोपार्जित मिळालेली शेती विकून करणार काय..? यामुळे नाईलाजास्तव तो शेती करतोय.राज्यकर्त्यांने हमी भावा न दिल्याने त्यांच्यावर कोसळलेले सुलतानी संकट आणि आता पावसाचे रूपाने त्याच्यावर कोसळलेले अस्मानी संकट यामुळे शेतकरी अक्षरशः खचला आहे.

 

 

 

मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांपुढे जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.उन्हाळ्यात वारंवार मागणी करून देखील शेती पिकांसाठी आणि जनावरांसाठी उजनी धरणातून न मिळणारे पाणी , आता अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांना पाणी नको असताना शेती पिकांना या पाण्याचा वेढा पडत आहे. पानंद रस्ते, ओढे, नदी व नाल्या मार्गे येणाऱ्या पाण्यामुळे शेतातील पिके जमीन दोस्त झाली आहेत.धरणाचे, नदीचं, ओढ्याचं पाणी घरादारात घुसल्याने उघड्यावर राहण्याची वेळ बळीराजावर आली आहे.

 

 

 

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला वगळता दहा तालुक्यांना पावसाचा जबर तडाखा बसला आहे.शेती पिकांसह दुभत्या जनावरांचे देखील यामध्ये मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात तातडीने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्यात यावा, शेतकऱ्यांना व सामान्य नागरिकांना तातडीची आर्थिक मदत, जनावरांसाठी चारा व घरांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पै.माऊली हेगडे यांनी मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button