शहरातील विस्कळित पाणीपुरवठा व गुंठेवारीच्या प्रश्नासह इतर स्थानिक समस्यांबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांनी घेतली सोलापूर महानगर पालिकेत अधिकाऱ्यांची बैठक…

सोलापूर
उन्हाळ्यापुर्वी शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.तसेच मागील अनेक वर्षांपासून हद्दवाढ भागातील नागरिकांना गुंठेवारी पद्धतीमुळे अनेक अडचणी येत आहेत.तो देखील प्रश्न मार्गी लागावा याकरिता आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या समवेत इतर अधिका-यांशी चर्चा करून, योग्य कारवाई करण्या संबंधितांना सुचना दिल्या…
उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासू नये त्यापुर्वी पाणीपुरवठा सुरळीत व्हावा शिवाय शहरातील सार्वजनिक शौचालय तातडीने दुरुस्त करून घ्यावेत अन्यथा जुने शौचालय पाडून नवीन बांधण्यात यावेत अशा सुचना देखील दिल्याची माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली ..
यावेळी माजी नगरसेवक प्रा नारायण बनसोडे,संजय कणके ,ज्ञानेश्वर कारभारी,राजकुमार पाटील, आदीसह पालिकेचे प्रशासनाकीय अधिकारी उपस्थित होते