maharashtrapoliticalsocialsolapur

सोलापुरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने केला बंदोबस्त…

रेबीज लसीकरणच्या कामकाजाला वेग...

सोलापूर

सोलापुरात गेल्या काही दिवसांपासून पिसाळलेल्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला होता.त्यामुळे सोलापूरकरांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. शहरात सर्वत्र कुत्र्यांचा सुळसुळाट असल्याने सोलापूरकरांना जीव मुठीत घेऊन दैनंदिन. दिवस घालवावा लागत होता.

 

याच पार्श्भूमीवर एखादी मोठी दुर्घटना घडण्यापुर्वी सोलापूर महानगर पालिकेने सतर्कता बाळगून शहरात मोकाट फिरणाऱ्या व पिसाळलेल्या कुत्र्यांना रेबीज लसिकरण देण्याचे कामकाज सुरू केले आहे. शनिवारी लक्ष्मी मार्केट येथे ही मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम पालिका आयुक्त यांच्या आदेशान्वये पार पाडण्यात येत आहे.

 

आपल्या परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर असेल आणि पिसाळलेले कुत्रे निदर्शनास पडल्यास 8390859691 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सोलापूर महानगर पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे…

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button