educationalmaharashtrasocialsolapur

सृष्टीच्या लाठी ‘पराक्रमा’ ची इंटरनॅशनल एक्सलेंस रेकॉर्ड व इंडिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद…

मुली शिवकालीन मर्दानी खेळाकडे आकर्षित होतील : सृष्टी बिळीअंगडी....

.सोलापूर :

स्वातंत्र्य सैनिक सिद्रामप्पा फुलारी प्रतिष्ठान, सोलापूर संचलित रूद्रशक्ती गुरुकलची विद्यार्थिनी सृष्टी धानप्पा बिळीअंगडी हिने रविवारी, ११ ऑगस्ट रोजी सलग १० तास १० मिनिट १० सेकंद लाठी फिरविण्याचा विक्रम केला. तिच्या कौशल्याच्या विक्रमाची नोंद इंटरनॅशन एक्सलेंस रेकॉर्ड व इंडिया बुक रेकॉर्डमध्ये झालीय. यावेळी जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत, माजी महापौर महेश कोठे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

हा विश्वविक्रमाचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज येथे रविवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता. सृष्टी बिळीअंगडी ही शिवकालीन लाठी फिरवणे या पारंपरिक व ऐतिहासिक खेळाचा विश्वविक्रम करण्यासाठी गेल्या एक वर्षापासून सराव करीत आली आहे.रुद्रशक्ती गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक योगीनाथ फुलारी तसेच मुख्य प्रशिक्षक विवेक मिस्कीन यांनी तिला मार्गदर्शन केलं. १३ वर्षाच्या सृष्टीनं आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय लाटीकाठीची स्पर्धा व त्याचबरोबर कराटे, योंगमुडो स्पर्धा खेळून विशेष प्राविण्य मिळवलं आहे.

सध्या सृष्टीचा सलग लाठी फिरवण्याचा सराव लाठी सराव केंद्राच्या प्रशिक्षणस्थळी योगिनाथ फुलारे यांच्या उपस्थितीत सुरु होता. सद्यस्थितीला ती अकरा तास सलग लाठी फिरवण्याचा सराव करीत होती. इयत्ता सातवीचा अभ्यासक्रम सांभाळत ती सोलापूरच्या नावलौकिकमध्ये भर घालणाऱ्या विक्रमाची नोंद तिच्या नावावर झालीय.

महाराष्ट्र हा जिजाऊंच्या लेकी व छत्रपती शिवाजी महाराज, अनेक महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. या भूमीतील मुली व महिला सक्षम व्हाव्यात. हा संदेश घेऊन शिवकालीन लाठी फिरविण्याच्या माध्यमाद्वारे सलग १० तास १० मिनिट १० सेकंदाच्या विक्रमाला मला गवसणी घालता आली. हे पाहून अनेक मुली लाठी-काठी त्याचबरोबर शिवकालीन मर्दानी खेळाकडे आकर्षित होतील व नवीन पिढी मोबाईलच्या विळख्यातून बाहेर पडेल, असंही सृष्टीनं यावेळी म्हटलंय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button