विधानसभा उपाध्यक्ष आण्णासाहेब बनसोडे शनिवार व रविवार सोलापूर मुक्कामी .
सोलापुरकरांच्या वतीने आण्णासाहेब बनसोडे यांचा भव्य नागरी सत्कार ..

सोलापूर
विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णासाहेब बनसोडे हे शनिवार व रविवार सोलापूर शहर – जिल्हा दौऱ्यावर येणार असून त्यानिमित सोलापुरात जय्यत तयार करण्यात आली आहे.
नियोजनाची रूपरेषा पुढीलप्रमाणे
शनिवार रूपरेषा
दिनांक :- २८ नोव्हेंबर २०२६
👉🏻प्रयाण सकाळी ९ वाजता काकडे रेसिडेन्सी चिंचवड पुणे येथून सोलापूर कडे { जेजुरी फलटण मार्गे}
👉🏻दुपारी १ वाजता पीपल्स एज्युकेशन सोसायटी वसतिगृहाला भेट स्थळ:- पंढरपूर
👉🏻दुपारी २ वाजता पंढरपूर येथून बारलोनीकडे प्रयाण { शेटफळ – कुर्डूवाडी मार्गे }
👉🏻दुपारी ३ वाजता श्री नानासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
👉🏻सायंकाळी ४ वाजता बारलोनी येथून माढ्याकडे प्रयाण
👉🏻सायंकाळी ४:३० वाजता अंकुश आवताडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट स्थळ :- माढा
👉🏻दुपारी ४.४५ मिनिटांनी माढ्यातून सोलापूरकडे प्रयाण
👉🏻सायंकाळी सहा वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम
रविवार रूपरेषा २९ नोव्हेंबर २०२६
👉🏻सकाळी ११ वाजता अल्पसंख्याक विकास निधीतून प्रभाग २० मध्ये सहारा नगर येथे नगरसेविका तसलीम इरफान शेख यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती
👉🏻दुपारी १२ वाजता शौकत पठाण यांच्या मंगल कार्यालयास भेट
👉🏻दुपारी १ वाजता चिराग रेसिडेन्सी सदिच्छा भेट दुपारी ३ ते सायंकाळी ५ ही राखीव वेळ
👉🏻दुपारी ५ वाजता निर्मलकुमार फडकुले सभागृहाच्या पटांगणावर आयोजित सत्कार सोहळ्याला उपस्थिती
👉🏻सायंकाळी ७ वाजता बाळासाहेब गायकवाड यांचे सुपुत्र रोहन बाळासाहेब गायकवाड यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थिती
👉🏻रात्री ८:३० वाजता सोलापूर येथून पुण्याकडे प्रयाण
सोमवार रूपरेषा ३० नोव्हेंबर
मध्यरात्री १२:३० वाजता काकडे रेसिडेन्सी चिंचवड , पुणे येथे आगमन व मुक्काम
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी आण्णासाहेब बनसोडे दुसऱ्यांदा सोलापूर दौऱ्यावर येत असून त्यांच्या या दौऱ्याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे. सद्य परिस्थितीत सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मरगळलेल्या अवस्थेत असून या दौऱ्या दरम्यान अनेक घडामोडी घडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.



