crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

कोंडी येथे धक्कादायक घटना! घरासमोरील वाहनांना आग; घरातून २५ लाखांची रोकड आणि १५ तोळे सोने चोरीला

तपासात हयगय होत असल्याचा शिंदे कुटुंबीयांचा आरोप; सीसीटीव्ही फुटेज आणि संशयितांची नावे देऊनही कारवाई नसल्याची तक्रार

सोलापूर

 

कोंडी येथे नागेश शिंदे आणि महेश शिंदे यांच्या घरासमोरील वाहनांना आग लावण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच त्यांच्या घरातून तब्बल २५ लाख रुपये रोख आणि १५ तोळे सोने चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे. या गंभीर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात घरातील चोरी आणि घरासमोरील वाहने जाळण्यासंदर्भातील व्हिडिओ फुटेज उपलब्ध करून देण्यात आले असून, संशयित आरोपींची नावेही पोलिसांना दिली आहेत. मात्र, एवढे पुरावे आणि माहिती देऊनही अद्याप ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप शिंदे कुटुंबीयांनी केला आहे.

 

 

 

तालुका पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी महेश घोडके हे या प्रकरणाच्या तपासात हयगय करत असल्याचा आरोपही शिंदे कुटुंबीयांनी केला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही तपासाला अपेक्षित गती मिळत नसल्याने कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.

घरातून लाखोंची रोकड आणि सोन्याची चोरी, तसेच घरासमोरील वाहनांना आग लावण्यासारखी गंभीर घटना घडूनही आरोपींवर कारवाई का होत नाही? तपासात नेमकी दिरंगाई कशामुळे होत आहे? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.

 

 

 

या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन निष्पक्ष तपास करावा, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून दोषींवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिंदे कुटुंबीयांनी केली आहे….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button