crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

पैसे डबल करण्याचे आमिष दाखवून ६.८० लाखांची लूट ; चौघे २४ तासांत जेरबंद

 

सोलापूर (प्रतिनिधी) :

 

 

पैसे डबल करून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीला मोदी बोगदा परिसरात बोलावून घेतल्यानंतर स्वतःला पोलीस असल्याचे सांगत मारहाण करून ६ लाख ८० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेणाऱ्या चौघांना सोलापूर शहर गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत जेरबंद केले. आरोपींकडून कार, मोटारसायकल, पाच मोबाईल फोन आणि ५ लाख ५० हजार रुपये रोख असा एकूण १४ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दि. २७ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मोदी बोगदा, स्मशानभूमीजवळील सार्वजनिक रस्त्यावर हा प्रकार घडला. पैसे डबल करून देतो, असे आमिष दाखवून फिर्यादीला तेथे बोलावून घेण्यात आले. फिर्यादी आल्यानंतर आरोपींच्या अन्य तीन साथीदारांनी स्वतः पोलीस असल्याचे सांगून त्यांना मारहाण केली आणि त्यांच्याकडील ६ लाख ८० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

 

 

 

 

या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या पथकांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. २८ सप्टेंबर रोजी पोलीस अंमलदार हाजीमलंग शेख यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून वांगी रोड येथील मोकळ्या मैदानात चार जण स्विफ्ट कार व दुचाकीसह संशयितरित्या थांबल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांच्या पथकाने छापा टाकून चौघांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये संतोष राजाप्पा पाटील (वय ४४, रा. बिदर, कर्नाटक), महिबूब युसूफ बिजापूरे (रा. महिबूब सुभानी दर्गाजवळ, डोणगांव रोड, सोलापूर), मल्लिकार्जुन यल्लप्पा शिवकळ्ळी (वय ४२, रा. राणीेबेन्नूर, जि. हवेरी, कर्नाटक) आणि मंजुनाथ कल्याणराव निडोडे (वय ३५, रा. हंडरे रोड, भालकी, जि. बिदर, कर्नाटक) यांचा समावेश आहे.

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांच्या पथकाने केली. पथकात हाजीमलंग शेख, अनिल जाधव, रामेश्वर साखरे, कल्लप्पा देखणे, अभिजित पवार, निलोफर तांबोळी, तसेच सायबर पोलीस ठाण्याचे मच्छिंद्र राठोड, चालक सतीश काटे व बाळासाहेब काळे यांचा सहभाग होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button