डॉ. श्रेया कुलकर्णी यांचे मास्टर ऑर्थोपेडिक फिजिओथेरपी परीक्षेत प्रथम श्रेणीत यश…

सोलापूर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह, अभ्यासू नेतृत्व, कर्तृत्व आणि योग्य व अचूक मार्गदर्शनासाठी परिचित असलेले मुकुंदराव कुलकर्णी यांच्या कन्या डॉ. श्रेया मुकुंद कुलकर्णी यांनी दोन वर्षांच्या अथक परिश्रमातून मास्टर ऑर्थोपेडिक फिजिओथेरपी परीक्षेत प्रथम श्रेणीत यश संपादन केले.
डॉ. श्रेया यांनी सातत्य, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर हे उल्लेखनीय यश मिळविले आहे. त्यांच्या या यशामागे आई-वडिलांची भक्कम साथ, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मोलाचे ठरले. शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे डॉ. श्रेया यांना आपल्या ध्येयाकडे यशस्वी वाटचाल करता आली.
डॉ. श्रेया कुलकर्णी यांच्या या यशाबद्दल त्यांचे, तसेच त्यांच्या यशासाठी सदैव पाठबळ देणाऱ्या आई-वडिलांचेही मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.
डॉ. श्रेया मुकुंद कुलकर्णी यांच्या भावी शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस पत्रकार रविंद्र नाशिककर यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा



