गुलमोहर सोसायटीमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; प्रा. राजशेखर शिंदे यांचे तरुण पिढीला आवाहन

सोलापूर (विशेष प्रतिनिधी):
गुलमोहर सोसायटीमध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साही आणि देशप्रेमाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ व्याख्याते प्राध्यापक राजशेखर शिंदे सर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर उपस्थित नागरिकांनी राष्ट्रध्वजाला अत्यंत आदराने सलामी दिली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रा. राजशेखर शिंदे यांनी स्वातंत्र्यलढ्यातील बलिदानाचा इतिहास अधोरेखित केला. ते म्हणाले, “भारताला मिळालेले स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नाही. त्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, आपले रक्त सांडले आहे. त्यामुळे आजच्या तरुण पिढीने या स्वातंत्र्यवीरांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपले जीवन जगले पाहिजे.
भारताचे रक्षण आणि देशाची प्रगती करण्याची मोठी जबाबदारी आता तरुण पिढीच्या खांद्यावर असून त्यांनी देशासाठी उत्तम कार्य करावे.”महिला भजनी मंडळाकडून वृक्षारोपणस्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गुलमोहर सोसायटीमधील ‘श्री शिव गणेश महिला सांस्कृतिक भजनी मंडळा’च्या वतीने सोसायटी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमासाठी रंजना बंडगर यांनी वृक्ष (रोपे) उपलब्ध करून देत मोलाचे सहकार्य केले.या मंगलप्रसंगी सोसायटीतील अनेक ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्ग, महिला भगिनी, बालगोपाळ, भजनी मंडळाच्या सदस्या आणि बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना चॉकलेट व खाऊ वाटप करण्यात आले, तसेच चहापानाचे आयोजन करून सोहळ्याची यशस्वी सांगता झाली.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ जाधव यांनी केले…



