crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

तुझ्या ” दादा आमदाराला ” गोळ्या घालून ठार कर आमदाराच्या वाहनचालकाला पैशाचे आमिष…

पैशाचे आमिष दाखवणाऱ्या दोघांविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...

 

सोलापूर / प्रतिनिधी

यात थोडक्यात हकीकत अशी की , यातील फिर्यादी आनंद स्वामीराव सुरवसे हे अक्कलकोटचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे वाहनचालक आहेत. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी व मुलास घेऊन आनंद सुरवसे सोलापुरातील महावीर चौकातील प्युमा शोरुम मध्ये खरेदीसाठी घेऊन गेले होते . कल्याणशेट्टी यांच्या पत्नी व मुलगा दोघेही शॉपिंग साठी शोरुम मध्ये गेले . व आनंद सुरवसे हे शोरुमच्या बाहेर वाहनाजवळ थांबले होते. त्यावेळी महावीर चौकात श्रीशैल
हुळळी व त्यांच्या समवेत फुलारी हे इसम येऊन.तुझ्या “दादाला” गोळ्या घालून मारून टाक मी तुला पैसे देतो त्यात तुझाच फायदा होईल असे आमिष दाखवून तेथून निघून गेले. या प्रकरणा पाठीमागे नेमका कुणी कट रचला ? याबाबत चर्चेला उधाण आलं आहे.

 

 

दरम्यान याबाबत तक्रारदार आनंद सुरवसे यांनी दिलेल्या फिर्यादी वरुण सदर बझार पोलिस ठाण्यात सुरवसे व फुलारी विरुद्ध ६५४ / २०२६ प्रमाणे भारतीय न्याय संहिता कलम ५५ , ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरवसे व फुलारी हे दोघेही घटनेनंतर फरार असून पोलिस त्यांच्या शोधासाठी पथकाची नेमणूक करून मार्गस्थ झाले आहे.या घटनेने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button