भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारिणीवर राजेश्री चव्हाण यांची निवड
प्रदेश कार्यकारिणीमध्ये सोलापूरला मिळाले स्थान

सोलापूर : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारिणीवर माजी नगरसेविका राजेश्री चव्हाण यांची निवड करण्यात आली. अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी ही निवड जाहीर केली.
माजी नगरसेविका राजेश्री चव्हाण यांनी सोलापूर शहर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीमधील गरजूंसाठी अनेक सामाजिक राजकीय उपक्रम राबविले आहेत. तसेच अनुसूचित जमातीमधील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन प्रदेश भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणीवर राजेश्री चव्हाण यांची निवड केली. त्यांच्या या निवडीमुळे सोलापूरला प्रदेश कार्यकारिणीमध्ये स्थान मिळाले आहे.
माजी नगरसेविका राजेश्री चव्हाण यांच्या या निवडीबद्दल भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष डॉ. देवराव होळी, अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश महामंत्री आ. योगेश सागर यांनी अभिनंदन केले.



