आईशक्ती फाउंडेशनतर्फे ४०० गरजू मुलींना शालेय साहित्याचे वाटप

सोलापूर : प्रतिनिधी
आईशक्ती फाउंडेशनतर्फे तब्बल ४०० गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप शनिवारी सोनामाता प्रशालेत करण्यात आले.
व्याहाती होमाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. याप्रसंगी व्यासपीठावर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर, पोलीस उपायुक्त (परिमंडळ) प्रीतम यावलकर, डॉ. अंबिका यावलकर, अनिकेत कलशेट्टी, सोलापूर गारमेंट मॅन्यूफॅक्चरिंग असोसिएशनचे संचालक अमित जैन, आईशक्ती फाउंडेशनचे संस्थापक मोहन डांगरे, आईशक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे, शाळा संस्थेच्या सचिवा कीर्तीलक्ष्मी अत्रे, मुख्याध्यापक जिलानी पटेल, पर्यवेक्षक भीमराव माने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींना दप्तर, वह्या असे शालेय देण्यात आले. सन्मित्र डेव्हलपर्सनेही गरजू मुलींना वह्या देऊन या उपक्रमात सहभाग नोंदवला. पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर म्हणाले, जीवनात शिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे आयुष्यात मनुष्याची प्रगती होते. आईशक्ती फाउंडेशनने केलेल्या सामाजिक उपक्रमामुळे हजारो मुली, महिलांना मोलाची मदत मिळाली आहे. संस्थेचे संस्थापक मोहन डांगरे आणि अध्यक्ष सृष्टी डांगरे हे निस्वार्थ भावनेने हे सामाजिक कार्य करत आहेत.
श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर म्हणाले, आईशक्ती फाउंडेशनतर्फे विडी घरकुल परिसरासह सोलापूर शहर जिल्ह्यात राबविण्यात येणारे उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहेत. लोकाभिमुख सामाजिक काम केल्यामुळे आईशक्ती फाउंडेशनच्या उपक्रमांचा समाजजीवनावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे, असेही डॉ. जयकर याप्रसंगी म्हणाले. यावेळी डॉ. अंबिका यावलकर, अमित जैन, अनिकेत कलशेट्टी, आईशक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी आईशक्ती फाउंडेशनच्या उज्वला शिरूर, तेजश्री लकशेट्टी, लता गुंडला, संध्या बिद्री, वासंती वाडी, लक्ष्मी कुर्लेकर, प्रीती कुर्लेकर, तेजस्विनी मरीगुड्डी आदी उपस्थित होत्या.
शिक्षिका सुजाता मायाचारी यांनी परिचय करून दिला. आईशक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे यांनी प्रास्ताविक केले. शिक्षिका राजश्री भोसगे यांनी सूत्रसंचालन तर शिक्षिका मीरा सुतार यांनी आभार प्रदर्शन केले.
———–
चौकट
माता पालकांना मिळाले समाधान
गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्य देण्याच्या या कार्यक्रमात शेकडो मातापालक ही उपस्थित होत्या. मुलींच्या शिक्षणाची गरज ओळखून आईशक्ती फाउंडेशनने शिक्षणासाठी त्यांना केलेल्या मदतीमुळे मातापालकांनी समाधान व्यक्त केले.



