World of Women च्यावतीने २१२ महिलांना एसटी बस प्रवास सवलत कार्डचे वितरण

सोलापूर :-
World of Women (WoW) या सामाजिक संस्थेच्या वतीने गरीब व होतकरू महिलांसाठी एसटी बस प्रवास सवलत कार्ड ( N.C. M.C.) काढून देण्याचे विशेष शिबिर कुमठा नाका परिसरात आयोजित करण्यात आले.या शिबिरामध्ये ज्येष्ठ महिलांसह एकूण २१२ महिलांना एसटी बस प्रवास सवलत कार्डचे वितरण करण्यात आले.

संस्थापिका विद्या लोलगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन महापालिकेचे सहाय्यक आयुक्त विनोद कुलकर्णी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते हाजीमलंग नदाफ तसेच मौलाना आझाद विकास महामंडळाचे माजी व्यवस्थापक सी.ए.बिराजदार, तात्यासाहेब भोसले,सायरा शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमाच्या माध्यमातून विविध वयोगटातील महिलांना एसटी.बस प्रवासाच्या भाड्यात ५० टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे. तसेच ६५ वर्षांवरील पुरुषांना ५० टक्के प्रवास सवलत मिळते. तर ७५ वर्षांवरील महिला व पुरुषांना अमृत ज्येष्ठ नागरिक कार्डद्वारे १०० टक्के म्हणजेच मोफत एसटी प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे.
अल्पावधीत आणि कमी खर्चात सदर कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल परिसरातील महिलांनी World of Women संस्थेचे आभार मानले.

या कार्यासाठी अभिषेक खांडेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.शिबिर यशस्वी करण्यासाठी मार्ता आसादे,शबाना मुलानी,गौरा कोरे, वैशाली देशपांडे,यशोदा सोनवणे,शारदा मसुती, स्वाती जाधव,पुष्पा हलकुडे लक्ष्मी माने यांच्यासह World of Women च्या पदाधिकारी महिलांनी विशेष परिश्रम घेतले.



