maharashtrapoliticalsocialsolapur

चाकोते नगर परिसरातील समस्यांची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी

.

 

सोलापूर :

 

चाकोते नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘आपला दरबार’ उपक्रमामध्ये नागरिकांनी परिसरातील विविध समस्या मांडल्या होत्या. त्यानुसार महानगरपालिकेचे अधिकारी आणि त्या भागातील सहकारी नगरसेवक यांच्यासमवेत चाकोते नगर, ब्रह्मनाथ नगर आणि पिठ्ठा नगर या परिसरांना प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांनी मांडलेल्या समस्यांची पाहणी करण्यात आली.

 

 

यावेळी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज तसेच इतर नागरी सुविधांबाबत नागरिकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांनी मांडलेल्या समस्यांची नोंद घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. तसेच या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी संबंधित विभागांकडून पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

 

 

या प्रसंगी परिसरातील नागरिक, महानगरपालिकेचे अधिकारी आणि सहकारी नगरसेवक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button