crimemaharashtrapoliticalsocialsolapur

एमपीआयडी(MPID) कायद्याअंतर्गत सुमारे ३ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेतील महिलेस मुंबई उच्च न्यायालय, सर्किट बेंच कोल्हापूर येथून सशर्त जामीन मंजूर

 

 

 

एमपीआयडी (Maharashtra Protection of Interest of Depositors Act, 1999) कायदा तसेच भारतीय दंड संहिता, १८६० अंतर्गत सुमारे ३ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार व फसवणुकीच्या आरोपाखाली जेल रोड पोलीस स्टेशन, सोलापूर येथे गु.र.क्र. ३३४/२०२४, दिनांक ०५ जुलै २०२४ रोजी आरोपी १) रमेश अंबादास चिप्पा व २) सुजाता रमेश चिप्पा (वय ३९ वर्षे, रा. साईबाबा चौक, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता, १८६० चे कलम ४०६, ४२० आणि ३४ तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण) अधिनियम, १९९९ (MPID Act) चे कलम ३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

 

 

 

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपींनी श्री ओम साई फायनान्सच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना अधिक परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्या ठेवी स्वीकारल्या. त्यानंतर गुंतवणूकदारांचा विश्वासघात करून एकूण १३१ गुंतवणूकदारांची सुमारे २.६९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता.

सदर प्रकरणात आरोपी क्र. २ सुजाता रमेश चिप्पा यांना दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालय, सर्किट बेंच कोल्हापूर येथे जामिनासाठी अर्ज दाखल केला.

 

 

 

आरोपीतर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की, आरोपी महिला सुजाता या केवळ मुख्य आरोपी रमेश चिप्पा यांच्या पत्नी असल्यामुळे त्यांना गुन्ह्यात गोविण्यात आले आहे. प्रथम माहिती अहवाल एफ. आय. आर) तसेच गुंतवणूकदारांच्या जबाबांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केवळ मुख्य आरोपी रमेश चिप्पा यांच्या विरुद्ध असून आरोपी महिला सुजाता यांनी कोणत्याही गुंतवणूकदाराशी संपर्क साधलेला नाही किंवा कोणतेही सेमिनार आयोजित केलेले नाही. कथित आर्थिक व्यवहाराशी त्यांचा थेट संबंध नसून, त्यांच्या बँक खात्यातील व्यवहारदेखील प्रत्यक्षात मुख्य आरोपीकडूनच करण्यात येत होते. त्यामुळे केवळ बँक खात्यातील व्यवहारांच्या आधारे आरोपी महिलेस गुन्ह्यात गोविणे योग्य नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला.

 

 

 

सरकार पक्षाने जामिनास विरोध केला. मात्र दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून मुंबई उच्च न्यायालय, सर्किट बेंच कोल्हापूर येथील मा. न्यायमूर्ती मेहरोज के. पठाण साहेब* यांनी जामीन अर्ज क्रमांक ४७७/२०२६ मध्ये दिनांक २२ जुलै २०२६ रोजी आरोपी सुजाता रमेश चिप्पा यांना सशर्त जामीन मंजूर केला.

या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी, ॲड. सौरभ तांदळे , ॲड. रोहित थोरात, पैगंबर सय्यद, ॲड. वैभव बोंगे, ॲड. ओंकार फडतरे, ॲड. सलामत पटेल, ॲड. शिवरत्न वाघ, ॲड. मोहीम पठाण, ॲड. मनिष बाबरे, ॲड. अजय वाघमारे, ॲड. त्वरिता वाघ, ॲड. संकेत पवार, ॲड. प्रदीप गायकवाड आणि ॲड. सागर स्वामी तर सरकार तर्फे ॲड. देशमुख यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button