आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्या निधीतून प्रभाग क्र. १२ मध्ये २० लाखांच्या काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

सोलापूर —
प्रभाग क्रमांक १२ मधील नितीन नगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरिक वस्ती सुधारणा योजना २०२५-२६ अंतर्गत स्थानिक आमदार विकास निधीतून आमदार श्री. देवेंद्र दादा कोठे यांच्या २० लाख रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज आमदार श्री. देवेंद्र दादा कोठे यांच्या शुभहस्ते तसेच सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, नगरसेविका सौ. सारिका ताई खजूरगी, श्री. सिद्धाराम खजूरगी, रामनगर विजयाताई गायकवाड, श्री. अतिश गायकवाड, शिंदे, नितीन चव्हाण, राम गायकवाड, श्री. अरविंद गायकवाड, सचिन चव्हाण, उत्तम गावडे, आदर्श देशमुख, आप्पा पवार, नितीन भोसले, श्री. नागनाथ गावडे तसेच आदिनाथ शक्ती नवरात्र उत्सव महामंडळाचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




