
सोलापूर
राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे विकासरत्न लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा श्री. अजित दादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली समन्वयक आमदार यशवंत तात्या माने , जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार , कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या विशेष पुढाकारातून DPDC मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या विशेष निधीतून धरमशी लाईन मुराराजी पेठ येथे संपूर्ण परिसर सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण 60 लाख 63 हजार 152 रुपये , पाण्याची पाईपलाईन 13 लाख 85 हजार 164 रुपये, ड्रेनेज लाईन करणे 31 लाख 21 हजार 157 रुपये, सामाजिक सभागृह बांधणे 20 लाख 96 हजार 224 रुपये असे एकूणच एक कोटी 27 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन समारंभ जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ नेते राजन जाधव , युवा नेते शंतनु साळुंखे, ॲड. विनोद सूर्यवंशी , रौफ अन्सारी , प्रभाकर वाघ, मकरंद माने, भारत वाघमोडे , रेवन कोरे, जय गायकवाड , सतीश जंगाले, जमादार चाचा यांच्या शुभहस्ते कुदळ मारून नारळ फोडून विकास कामांचे भूमिपूजन आनंदी वातावरणात पार पडले.
व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर यांचा सत्कार सोहळा याप्रसंगी पार पडला.
प्रस्ताविक पर भाषणात युवा नेते शंतनू साळुंखे यांनी जे काम एका नगरसेवकाने , माजी महापौराने करणे अपेक्षित आहे ते काम संतोष भाऊ पवार यांनी करून दाखवले आहे. एवढा मोठा निधी एखाद्या चाळीसाठी आणने हे खरंच कौतुकास्पद आहे हे काम फक्त संतोष भाऊ पवार हेच करू शकतात असे मनोगत व्यक्त केले.
ज्येष्ठ नेते राजन भाऊ जाधव यांनी त्यांच्या भाषणात राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार हे राज्याचे विकासरत्न नेतृत्व असून त्यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी प्रभागाचा सर्वांगीण विकासासाठी खेचून आणलेला निधी आणि जनहितार्थ कामे यांचे विशेष कौतुक केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांनी त्यांच्या भाषणात प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी संतोष भाऊ पवार यांची असणारी तळमळ हे खरंच कौतुकास्पद आहे. संतोष भाऊ पवार यांचे प्रशासनावर विशेष प्रभुत्व आहे . मनमिळाऊ स्वभाव आणि न बोलता विविध विकासकामे करून दाखवण्याची धमक आदरणीय संतोष भाऊ पवार यांच्यात आहे.
जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी त्यांच्या भाषणात राज्याचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वात समन्वयक यशवंत तात्या माने यांच्या मान्यतेने DPDC मधील विशेष निधी तब्बल एक कोटी 27 लाख रुपये धरमशी लाईनच्या विकासासाठी कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या सहकार्यातून खेचून आणला असे प्रतिपादन करतानाच येणाऱ्या काळात आपल्या या भागाचा विकास करण्याकरता हवा तेवढा निधी आणू असे आश्वासन जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी दिले… विकास निधी आणला म्हणून चाळीतील स्थानिक नागरिकांनी आभार प्रकट करण्याची गरज नसून चाळ हे आपले कुटुंब आहे कुटुंबासाठी केलेल्या कामाबद्दल आभार मानण्याची अपेक्षा कुटुंबातील व्यक्तीने करणे योग्य नाही त्यामुळे हे माझे कर्तव्य असून या पुढे देखील मी माझे हे कर्तव्य पार पाडण्यासाठी तुमचे शुभेच्छा पर आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे राहाल अशी अपेक्षा व्यक्त केली….
या कार्यक्रमाप्रसंगी प्रभाकर माने हरिभाऊ पवार दादा सुरवसे डॉक्टर सेल अध्यक्ष संदीप माने, शामराव गांगर्डे , पवन चव्हाण सुशांत पुणेकर , अजित चव्हाण , विपुल केसकर, ज्ञानेश्वर सोलनकर संतोष काळे , संतोष मस्के , अनिकेत पवार गिरीश पवार चाळीतील माता भगिनी ज्येष्ठ नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष वैभव गंगणे यांनी तर आभार ज्ञानेश्वर सोलनकर यांनी मानले…