पुतळा दुर्घटनेतील दोषीवर गुन्हे दाखल करा.:- संभाजी ब्रिगेड…

सोलापूर
राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची निकृष्ठ कामामुळे दुर्घटना घडल्याने संबधित मूर्तिकारावर व अधिकाऱ्यांवर उच्चस्तरीय चौकशी होऊन फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदाद्वारे संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.
४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनानिमित्त नौदल विभागाच्या वतीने राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला होता. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. हा पुतळा शिवप्रेमींसाठी आकर्षनाचा ठरला होता.
आठ महिन्यातच पुतळा कोसळला ही दुर्दैवी बाब असून, या घटनेचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र निषेध करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत. या घटनेमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाला आहे त्यामुळे निकृष्ट काम करणाऱ्यां मूर्तिकारावर व संबंधित विभागाने जे निकृष्ट दर्जाचे काम केले व आमच्या अस्मितेला धक्का दिला त्यांची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करुन फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने कराण्यात आली.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले शहराध्यक्ष शिरिष जगदाळे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अरविंद शेळके जिल्हा संपर्कप्रमुख छत्रगुण माने शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद शहर संघटक रमेश चव्हाण शेखर कंटेकर वैभव धुमाळ लखन पारसे दिलीप निंबाळकर चेतन सुरवसे आदी उपस्थित होते.