
सोलापूर
मंगळवार १३ ऑगस्ट रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार व महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर अमर रहे, अमर रहे ,यळकोट यळकोट जय मल्हार अश्या घोषणा देण्यात आल्या.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या बाबतीत सांगायचे झाले तर मुलाच्या मृत्यूपश्च्यात अहिल्याबाई स्वतः राज्यकारभार पाहू लागल्या. .
धार्मिक कार्य:-
मंगळवार १३ ऑगस्ट रोजी अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी आहे. अहिल्यादेवींचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला.वयाच्या ८ व्या वर्षीच अहिल्याबाईंचा विवाह खंडेराव होळकर यांच्याशी झाला. त्यांना मालोजीराव आणि मुक्ताबाई ही दोन अपत्ये होती.
पती खंडेरावांच्या मृत्यूनंतर बारा वर्षांनी सासरे मल्हाराव होळकरांचा मृत्यू झाला. त्यानंतर एकाच वर्षांनी राज्यकारभार पाहणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा देखील मृत्यू त्यांना पाहावा लागला. मुलाच्या मृत्यूपश्च्यात अहिल्याबाई स्वतः राज्यकारभार पाहू लागल्या.
अहिल्याबाईनी आपल्या इंदूर संस्थानातील प्रजेसाठी अनेक हितकारक निर्णय घेतले. रस्ते बांधले, धरणे बांधली, विहिरी खोदल्या. शेतकरी जनतेला डोळ्यासमोर ठेऊन अनेक कामे केली. मात्र त्या बरोबरच त्यांनी आपल्या राज्याबाहेर देखील अनेक कार्य केले. सामाजिक बांधिलकी आणि धार्मिक परंपरांची योग्य सांगड अहिल्यादेवींनी घातली.
अहिल्याबाई होळकर यांनी केलेले कार्य
भारतात चारी दिशांनी असलेल्या धर्मसंस्थांवर त्यांनी मंदिरे, घाट, मठ, धर्मशाळा, पाणपोया यांची उभारणी केली. देशाच्या सांस्कृतिक ऐक्याचा त्यांचा हा प्रयत्न खूप मोठा होता.
अहिल्याबाईंनी प्रमुख तीर्थक्षेत्री विशेषतः
अयोध्या, नाशिक, द्वारका, पुष्कर, हृषीकेश, जेजुरी, पंढरपूर, गया, उदेपूर, चौंढी येथे मंदिरे बांधली. यांशिवाय सोरटी सोमनाथ, ओंकारेश्वर, मल्लिकार्जुन, औंढानागनाथ, काशीविश्वेश्वर, विष्णुपाद, महाकाळेश्वर आदी मंदिरांचा जीर्णोद्धार केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी व महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर यांनी त्यांच्या मनोगतात अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत पुण्यतिथी निमित्त अभिवादन केले…
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार,जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले , सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव,
महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, अल्पसंख्याक अध्यक्ष अमीर शेख , मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेहराज आबादीराजे ,युवक समनव्यक महेश कुलकर्णी,सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे ,
OBC विभाग सेल अध्यक्ष अनिल छत्रबंद,
वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख,वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, प्रज्ञासागर गायकवाड ,सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे ,कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे,श्यामराव गांगर्डे ,शरद येच्चे , प्रियंका जगझाप
यांची उपस्थिती होती…