maharashtrapoliticalsocialsolapur

विद्यार्थ्यांत ज्ञानाऐवजी स्पर्धेची भावना चुकीची…

अॅड. मिहीर प्रभूदेसाई; दत्ताअण्णा सुरवसे अमृतमहोत्सव व्याख्यानमाला...

: ब्रिटिशांनी प्राचीन ज्ञान व ज्ञानदान पद्धतीवर आघात करून नवी शिक्षण पद्धती आणली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाऐवजी स्पर्धेची भावना जास्त रुजत आहे, जे की चुकीचे आहे, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अॅड. मिहिर प्रभूदेसाई यांनी येथे व्यक्त केले.

येथील सुरवसे शिक्षण संकुलात समाजसेवक दत्तुअण्णा सुरवसे अमृतमहोत्सवानिमित्त व्याख्यानमालेत ते आधुनिक शिक्षणपद्धती व शिक्षकांचे योगदान या विषयावर पुष्प गुंफताना ते बोलत होते.

प्रभूदेसाई म्हणाले, शिक्षकांनी केलेल्या भरीव योगदानामुळेच भारताची आजची पिढी समृद्ध झाली आहे. प्रलय और निर्माण शिक्षक की गोद में खिलते है हे कवींनी मांडलेले मत सत्य आहे. सध्याच्या काळातील शिक्षणाचे बाजारीकरण ही विद्यार्थी घडवण्याची चुकीची पद्धत बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी दत्ताअण्णा सुरवसे व प्रभा सुरवसे या दांपत्याचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. तसेच यावेळी मानवता विकास मंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा आदी संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार झाला.

दत्ता अण्णा सुरवसे यांच्यासारखे दानशूर व्यक्तिमत्व

समाजासाठी देवदूतच आहेत असे प्रतिपादन नरेंद्र काटीकर यांनी केले. या कार्यक्रमास राजकुमार सुरवसे, मनीष सुरवसे, राखी सुरवसे, वैशाली सुरवसे, विजय सुरवसे, श्वेता सुरवसे, रवींद्र नाशिककर, डॉ. नासीमा पठाण, हेमा चिंचोळकर, डॉ. श्रीकांत

येळेगावकर पी.पी. कुलकर्णी, पद्माकर कुलकर्णी, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने, शिक्षण विस्तार अधिकारी बापूसाहेब जमादार यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील गणमान्यांची उपस्थिती होती. प्राचार्या उज्वला साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. शुभांगी सगर यांनी आभार मानले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia