इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं देवी भक्तांना छत्री, नॅपकिन आणि महाप्रसादाचे वाटप…
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त गेली 25 वर्षापासून देवी भक्तांसाठी आजतागायत अखंड सेवा:-लक्ष्मण मामा जाधव..
सोलापूर –
कोजागिरी पौर्णिमा निमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी सोलापूर तुळजापूर मार्गावरून लाखो भाविक अनवाणी पायी चालत तुळजापूरच्या दिशेने मुखी आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो भवानी माते की जयचा जयघोष करीत रवाना होत असतात. दरम्यान गेल्या पंचवीस वर्षापासून इच्छा भगवंताची मित्र परिवाराचे संस्थापक लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाने सोलापूर तुळजापूर मार्गावरील गणपती घाट येथे महाप्रसादाचा वाटप करण्यात येतो यंदाच्या वर्षी दिवसभर ऊन आणि रात्री पावसाचे वातावरण असल्याने भक्तांची गैरसोय होऊ नये या हेतूने लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव, कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड, मार्गदर्शक अनिल जाधव, यांच्या नेतृत्वाखाली इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीने तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या भक्तांना छत्री नॅपकिन आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
शारदीय नवरात्र महोत्सवात इच्छा भगवंताची मित्रपरिवार नवरात्र महोत्सव मंडळाच्या शक्ती देवीची जागर मोठ्या भक्ती भावाने व अमाप उत्साही वातावरणात साजरा होत असतो .
तसेच गेले पंचवीस वर्षापासून तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या भक्तांसाठी अखंडित सेवा आज तागायत सुरू असल्याचे मंडळाचे सर्वेसर्वा, मार्गदर्शक लक्ष्मण मामा जाधव यांनी यावेळी सांगितले. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील देवी भक्तांमध्ये उत्साहाचा वातावरण असून भक्तांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने इच्छा भगवंताची परिवाराने यंदाच्या वर्षी अभिनव उपक्रम राबविले असल्याचे राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव म्हणाले.
यावेळी लक्ष्मण मामा जाधव यांच्या उपस्थितीत देवी भक्तांना छत्री नॅपकिन आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले याप्रसंगी. राष्ट्रवादी शहराध्यक्ष संतोष पवार, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी,महेश निकंबे, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड, महिला शहराध्यक्ष संगीताताई जोगदनकर, युवती अध्यक्षा किरण माशाळकर, शिवाजी गायकवाड,अंबादास गायकवाड,मोहन जाधव,अंबादास जाधव,संगीता गायकवाड,लक्ष्मी पवार ,किरण मोहन मामा चव्हाण,सत्तार सय्यद,उमेश जाधव,अमोल सरवाळे, सतीश लोंढे,श्रीगणेश लाडू, निलेश कांबळे, संतोष गायकवाड,हरीश तेलगू, निलेश कांबळे ,शरद शिंदे,सचिन गुत्तेदार ,अरविंद शेरखान निकम ,पंडित शेटे, सागर कांबळे,सचिन पिसे ,अमोल लकडे,शिवा बंडगर,शिवाजी जाधव, मारुती अकलूजकर,बार्शीकर दादा,दीपक नंदुरकर,राहुल जाधव,सचिन जाधव,विनोद जाधव, पवन गायकवाड,कार्तिक जाधव, अजिंक्य जाधव, गजू शिंदे, कमलेश सातपुते, अमोल जगताप, किरण शिंदे, दिनेश आवटे,सोनू पटेल, सचिन जाधव,आकाश जाधव, जयेश जाधव, प्रथमेश पवार, ऋषी येवले,महादेव राठोड, वसंत कांबळे, माणिक कांबळे, उमेश जाधव, अमोल जगताप,किरण शिंदे,दशरथ शेडगे ,प्रकाश जाधव,सोमनाथ शिंदे ,हुलगप्पा शासम, अमन शिंगे, श्रेयस उकरांडे, दर्शन बिराजदार,सुजल कटारे आदींसह इच्छा भगवंताची मित्रपरिवाराचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.