रेशन प्रणालीतील धान्य वाटपात सोलापूर अन्नधान्य वितरण कार्यालय राज्यात प्रथम…
सोलापूर
केंद्रिय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अनुसार प्रत्येक महिन्याच्या ७ ते १५ तारीख हे अन्न सप्ताह म्हणून साजरा करणे हे दुकानदारांना अनिवार्य आहे. अन्नसुरक्षा योजनेत लाभार्थीना आपण खात असलेले सकस व पौष्टिक धान्या बाबतीची जागरूकता समजावणे हा मुख्य उद्दिष्ट आहे.परंतु मागील दहा वर्षात राज्यभरात हे मोहीम राबवित नसल्याचे स्पष्टपणे चित्र दिसून येत असताना, मात्र सोलापूर शहर अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाने मात्र ह्या मोहिमेला सकारात्मक भूमिका घेऊन ऑक्टोबर महिन्यात धान्य वाटपात राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. अन्नधान्य वितरण अधिकारी ह्यांनी सुरुवातीला रास्त भाव धान्य दुकानंदाराचे बैठक घेऊन त्यांना लाभार्थी मध्ये ह्या अन्नसप्ताह मोहिमे बाबतीत जनजागृती करण्याचे सक्त सूचना देण्यात आले होते. त्याप्रमाणे मागील अवघ्या दोनच महिन्यात नागरिकांमध्ये जनजागृती होऊन रेशन दुकानासमोर रांगा दिसत आहे.जे दुकानदार जाणीवपूर्वक धान्य उशिरा वाटप करत आहेत अश्या सर्वांना कार्यालयाच्या वतीने नोटीस बजाविण्यात आले.त्यामुळे रास्त भाव धान्य दुकानदार आता चांगलेच धास्तावले आहेत. तर दुसरीकडे मात्र महिनाभर रेशन दुकानाचे हेलपाटे मारणार्यांना लाभार्थीनी महिन्याच्या पंधरावड्यातच धान्य मिळाल्याने समाधान व्यक्त केले आहे.दुकानदारात धान्य वाटपात सुरळीतपणा व लाभार्थीना वेळेत धान्य मिळालेल्या लोकाभिमुख कार्यास मात्र सोलापूर जिल्हा संघटनेने अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे ह्यांचे आभार व्यक्त केले आहे.केंद्र शासनाच्या ekyc ह्या मोहिमेला देखील सोलापूर अन्नधान्य वितरण अधिकारी ह्यांनी चांगलाच जोर धरल्याने ekyc मध्ये देखील सोलापूर शहर राज्यात अग्रेसर आहेत.एकंदरीत रास्त भाव धान्य दुकानादारांना वेळत धान्य वाटपाचे शिस्त लावल्याने अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे ह्यांचे जनसामान्य नागरिकांतून कौतुक होत आहे.