maharashtrapoliticalsocialsolapur

जिजाऊ ब्रिगेडचे 3 एप्रिल रोजी मुंबई येथे राज्य महाअधिवेशन:-स्वाती भोसले -पवार ….

सोलापूर

महिलांचे सामाजिक सांस्कृतिक व वैचारिक विचारपीठ असलेल्या जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी राज्यस्तरीय महाअधिवेशन श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर मुंबई (दादर) येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
या अधिवेशनासाठी महाराष्ट्रासह देशभरातून जवळपास एक हजार महिला पदाधिकारी सहभागी होणार आहेत तसेच प्रत्येक जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित राहणार असून या अधिवेशनातील वैचारिक प्रबोधनाचा व सांस्कृतिक उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील,जिल्ह्यातील तसेच शहरातील महिलांनी उपस्थित राहण्याचे आव्हान जिजाऊ ब्रिगेडच्या शिवमती स्वाती पवार महाराष्ट्र प्रदेश सदस्य यांनी केले आहे.

 

 

 

 

हे महाअधिवेशन एकूण चार सत्रामध्ये पार पडणार असून उद्घाटन म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या महापौर शिवमती रितूताई तावडे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा शिवमती सीमाताई बोके असणार आहेत.
कार्यक्रम स्थळी विविध सुप्रसिद्ध वक्ते यांचे मार्गदर्शन लाभणार असून अधिवेशनस्थळी जिजाऊ ब्रिगेडच्या स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे.

 

 

 

या अधिवेशनासाठी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड पुरुषोत्तम खेडेकर, शिवधर्म संसद सदस्य शिवमती रेखाताई खेडेकर तसेच मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष इंजि.विजय घोगरे, राज्य कार्याध्यक्ष शिवश्री नवनाथ घाडगे प्रदेश महासचिव चंद्रशेखर शिखरे, जिजाऊ ब्रिगेड महासचिव स्नेहाताई खेडेकर आंतरराष्ट्रीय अध्यक्षा मयुराताई देशमुख, राष्ट्रीय अध्यक्ष निर्मलाताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 

 

 

या अधिवेशनासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य उपाध्यक्ष अंजलीताई भोसले, मुंबई अध्यक्ष स्मिता देसाई, नवी मुंबई अध्यक्ष भारतीताई पाटील, महासचिव सरिताताई सोमवंशी, कार्याध्यक्ष मनीषाताई देसाई, ठाणे जिल्हाध्यक्ष सुनिता पाटील व मुंबईची सर्व टिम अथक परिश्रम घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia