politicalmaharashtrasocialsolapur

सहाय्यक आयुक्त खंदारे यांना निलंबित करा संभाजी ब्रिगेड.

 

सोलापूर

 

 

शिवजयंती उत्सव साजरा न करणाऱ्या व शिवप्रेमी जाब विचारणारे मावळ्यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर येथील संबंधित जबाबदार महिला अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशा मागणीचे नियोजन संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले तसेच मुख्यमंत्री सामाजिक न्याय मंत्री व समाज कल्याण आयुक्त यांना सुद्धा ई-मेलद्वारे कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार, राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी साजरी करणे अनिवार्य आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही, सोलापूर येथे एक अत्यंत संतापजनक प्रकार घडला आहे.

 

 

 

दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ निमित्त जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर या शासकीय कार्यालयामध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली नाही. या गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी गेलेल्या शिवभक्तांना सन्मानाची वागणूक देण्याऐवजी, तेथील कार्यालय प्रमुख महिला कर्मचाऱ्याने अत्यंत अरेरावीची भाषा वापरली, शिवीगाळ केली आणि जातीय द्वेष निर्माण होईल असे वर्तन केले.
भारतीय संविधानानुसार जातीभेद लिंगभेद याला थारा नाही.

 

 

 

१. शासकीय आदेशाचा अवमान: संबंधित कार्यालयाने शासनाच्या अधिकृत परिपत्रकाचा भंग केल्याबद्दल त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई व्हावी.

२. अरेरावी व गैरवर्तन: शिवभक्तांशी अश्लाघ्य भाषेत बोलणाऱ्या आणि सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या संबंधित महिला कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित (Suspend) करण्यात यावे.

३. फौजदारी कारवाई: शासकीय पदाचा दुरुपयोग करून जातीयवाद निर्माण केल्याप्रकरणी संबंधित महिलेवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा.
छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत. शासकीय खुर्चीवर बसून त्यांच्या जयंतीचा अवमान करणे आणि विचारणाऱ्या नागरिकांना अपमानित करणे, हे लोकशाहीत खपवून घेतले जाणार नाही.
तरी प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल असा इशारा संभाजी ब्रिगेड च्या वतीने देण्यात आला आहे.

 

 

 

 

यावेळी संभाजी ब्रिगेडचे श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले शहराध्यक्ष शिरीष जगदाळे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनलदास शहर कार्याध्यक्ष सोनाली सगर जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले शहर उपाध्यक्ष संतोष सुरवसे सोमनाथ मेनकुडले संतोष मकानदार सिताराम बाबर आधी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button