बाळकृष्ण विद्यायालय, नंदेश्वर, ता. मंगळवेढा येथे दहावी परीक्षेदरम्यान तोतया १० विदयार्थांना दुस-या विद्यार्थाच्या जागी परिक्षा देताना १० तोतया विद्यार्थ्यांना अटक…

सोलापूर
जिल्हामध्ये दिनांक २०/०२/२०२६ पासून इयत्ता १० वी च्या परीक्षा सुरू झाल्यासून माध्यमिक शिक्षण मंडळाकडून प्रत्येक परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक व सहायक केंद्र संचालक यांची नियुक्ती करण्यात येते. तसेच मा.श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी जिल्ह्यातील १० व १२ वी च्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार रोखण्यासाठी योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे.
मौजे नंदेश्वर, ता. मंगळवेढा येथील बाळकृष्ण विद्यालयामध्ये १० वीच्या परीक्षेचे केंद्र आहे. सदर परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक म्हणून श्री. विठ्ठल एकमल्ली, मुख्याध्यापक बाळकृष्ण विद्यालय, नंदेश्वर व सह केंद्रसंचालक म्हणून मारूती निकम, इंग्लीश स्कूल भोसे, ता. मंगळवेढा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर केंद्रामध्ये सुतार इंटरनॅशनल स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, लक्ष्मीदहीवडी, ता. मंगळवेढा या शाळेतील १० वीच्या वर्गात शिकणारे विद्यार्थांचे क्रमांक आले होते. सदर शाळेवर दिनांक २०/०२/२०२६ रोजी दहावीच्या परीक्षेदरम्यान केंद्र संचालक व सहसंचालक हे परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थांचे प्रवेशपत्र व ओळखपत्र यांची पडताळणी करत असताना त्यामध्ये तफावत दिसून आल्याने अधिक चौकशी केली असता सुतार इंटरनॅशनल स्कूल, लक्ष्मीदहीवडी येथील १० मुळ विदयार्थीयांचे जागी दुसरेच तोतंया १० विदयार्थी बसवून पेपर लिहीत असल्याबात दिसून आले होते. सदर १० तोतया विद्यार्थांना मंगळवेढा पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर प्रकरणी श्री. विठ्ठल एकमल्ली, मुख्याध्यापक बाळकृष्ण विद्यालय, नंदेशवर तथा केंद्र संचालक,
माध्यमिक परीक्षा मंडळ केंद्र नंदेश्वर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवेढा पोलीस ठाणे येथे गुरनं ११०/२०२६, भा. न्या.सं.क.३१९, ३३६ (२), (६), ३३७, ३३९, ३४०, सह महाराष्ट्र विद्यापिठाच्या व मंडळाच्या परीक्षामधील गैरप्रकारांना प्रतिबंधक अधिनिमय १९८२ चे कलम ७,८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मा. पोलीस अधीक्षक, अतुल कुलकर्णी, सोलापुर ग्रामीण यांनी विदयार्थी व पालकांनी कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना बळी न पडता नियमांचे पालन करावे, तसेच अशा प्रकारची माहिती तात्काळ प्रशासनाला कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रकरणी परीक्षा प्रक्रियेची संहीता अबाधित ठेवण्यासाठी कडक कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दोषींवर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास Zसुरू आहे..बाळकृष्ण विद्यायालय, नंदेश्वर, ता. मंगळवेढा येथे दहावी परीक्षेदरम्यान तोतया १० विदयार्थांना दुस-या विद्यार्थाच्या जागी परिक्षा देताना १० तोतया विद्यार्थ्यांना अटक
सोलापूर जिल्हामध्ये दिनांक २०/०२/२०२६ पासून इयत्ता १० वी च्या परीक्षा सुरू झाल्यासून माध्यमिक शिक्षण मंडळाकडून प्रत्येक परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक व सहायक केंद्र संचालक यांची नियुक्ती करण्यात येते. तसेच मा.श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी जिल्ह्यातील १० व १२ वी च्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार रोखण्यासाठी योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे.
मौजे नंदेश्वर, ता. मंगळवेढा येथील बाळकृष्ण विद्यालयामध्ये १० वीच्या परीक्षेचे केंद्र आहे. सदर परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक म्हणून श्री. विठ्ठल एकमल्ली, मुख्याध्यापक बाळकृष्ण विद्यालय, नंदेश्वर व सह केंद्रसंचालक म्हणून मारूती निकम, इंग्लीश स्कूल भोसे, ता. मंगळवेढा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर केंद्रामध्ये सुतार इंटरनॅशनल स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, लक्ष्मीदहीवडी, ता. मंगळवेढा या शाळेतील १० वीच्या वर्गात शिकणारे विद्यार्थांचे क्रमांक आले होते.
सदर शाळेवर दिनांक २०/०२/२०२६ रोजी दहावीच्या परीक्षेदरम्यान केंद्र संचालक व सहसंचालक हे परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थांचे प्रवेशपत्र व ओळखपत्र यांची पडताळणी करत असताना त्यामध्ये तफावत दिसून आल्याने अधिक चौकशी केली असता सुतार इंटरनॅशनल स्कूल, लक्ष्मीदहीवडी येथील १० मुळ विदयार्थीयांचे जागी दुसरेच तोतंया १० विदयार्थी बसवून पेपर लिहीत असल्याबात दिसून आले होते. सदर १० तोतया विद्यार्थांना मंगळवेढा पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर प्रकरणी श्री. विठ्ठल एकमल्ली, मुख्याध्यापक बाळकृष्ण विद्यालय, नंदेशवर तथा केंद्र संचालक,
माध्यमिक परीक्षा मंडळ केंद्र नंदेश्वर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवेढा पोलीस ठाणे येथे गुरनं ११०/२०२६, भा. न्या.सं.क.३१९, ३३६ (२), (६), ३३७, ३३९, ३४०, सह महाराष्ट्र विद्यापिठाच्या व मंडळाच्या परीक्षामधील गैरप्रकारांना प्रतिबंधक अधिनिमय १९८२ चे कलम ७,८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मा. पोलीस अधीक्षक, अतुल कुलकर्णी, सोलापुर ग्रामीण यांनी विदयार्थी व पालकांनी कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना बळी न पडता नियमांचे पालन करावे, तसेच अशा प्रकारची माहिती तात्काळ प्रशासनाला कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रकरणी परीक्षा प्रक्रियेची संहीता अबाधित ठेवण्यासाठी कडक कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दोषींवर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे..



