Businessmaharashtrapoliticalsocialsolapur

वीज कर्मचाऱ्यांचे सोलापुरात ७ फेब्रुवारी २०२६ पासून ३ दिवस अधिवेशन भव्य मिरवणुकीने व खुले अधिवेशनाने सुरुवात.

देशातील व राज्यातील वीज उद्योग हा सार्वजनिक उद्योग आहे. त्याचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे. मी तुमच्या पाठीशी आहे:-मा.सुशील कुमार शिंदे केंद्रीय ऊर्जा व गृहमंत्री व माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य....

 

सोलापूर

 

 

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन (संलग्न ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस व ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईज) या संघटनेचे ३ दिवसाचे अधिवेशन दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ पासून सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेले आहे. दिनांक ७ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज चौक, सोलापूर इथून सकाळी १०.०० वाजता मशाल पेटवून भव्य मिरवणूक सोलापूर शहरात सुरुवात झाली. दुपारी १.३० वाजता मिरवणूक हरीभाई देवकर प्रशाला पटांगण,होम मैदान सोलापूर येथे पोहोचल्यानंतर संघटनेच्या ध्वजाचे अनावरण संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड मोहन शर्मा (राष्ट्रीय सरचिटणीस) ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईज यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

उद्घाटक म्हणून मा.नामदार सुशीलकुमारजी शिंदे (माजी केंद्रीय ऊर्जा व गृहमंत्री तथा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून झाले. अधिवेशनाचे स्वागत पर भाषण कॉम्रेड विलास कोल्हे यांनी केले. अधिवेशनाचे प्रास्ताविक कॉम्रेड कृष्णा भोयर सरचिटणीस महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन यांनी करताना देशातील व राज्यातील वीज उद्योगाच्या परिस्थितीवर प्रकाश टाकला.

 

 

 

माननीय सुशील कुमार शिंदे अधिवेशनाचे उद्घाटन करताना म्हणाले की, देशातील वीज उद्योग हा राज्यातील व देशातील जनतेच्या पैशात पैसातून उभा राहिलेला आहे. हा सार्वजनिक उद्योग आहे या उद्योगामुळे देशाची व राज्याची सर्वांगी प्रगती झालेली आहे. हा उद्योग उभा करण्यामध्ये महाराष्ट्रातील वीज कामगारांचा मोठा योगदान आहे म्हणून या उद्योगाचे खाजगीकरण होता कामा नये. या उद्योगाचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न सरकारने केला तर मी तुमच्या बरोबर आहे. या संघटनेचे भूतपूर्व अध्यक्ष कॉम्रेड ए.बी.बर्धन यांनी विद्युत कायदा २००३ मध्ये ज्या सुधारणा मांडल्या होत्या त्या आम्ही स्वीकारलेले आहे. त्यांची ही संघटना वीज उद्योगाच्या प्रगती करता सातत्याने भांडत आहे. अधिवेशनाला त्यांनी शुभेच्छा दिल्या.

 

 

 

अधिवेशनाला मार्गदर्शक कॉम्रेड श्री.श्रीकुमार (उपसरचिटणीस) जागतिक कामगार संघटना (तामिळनाडू), कॉम्रेड राजन क्षिरसागर (अध्यक्ष), ऑल इंडिया किसान सभा नई दिल्ली, कॉम्रेड मोहम्मद मगबुल गणा (राष्ट्रीय सचिव, अखिल भारतीय राज्य कर्मचारी महासंघ (श्रीनगर), कॉम्रेड श्याम काळे (सरचिटणीस), ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश, कॉम्रेड जी.साईबाबू (सरचिटणीस), तेलंगाना स्टेट इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईज युनियन, कॉम्रेड व्ही.व्यंकटेशरलू (अध्यक्ष) तेलंगणा स्टेट इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईज युनियन, कॉम्रेड मोहम्मद इकबाल (सरचिटणीस), अराजपत्रित इलेक्ट्रिकल एम्प्लॉईज असोसिएशन (श्रीनगर), श्री.भरत पाटील, श्री.पुरुषोत्तम वारजूरकर, श्री.ललित गायकवाड (मुख्यऔद्योगिक संबंध अधिकारी) पारेषण, निर्मिती व वितरण वीज कंपन्यातील अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
दि.७ फेब्रुवारी रोजी झालेल्या दहा हजार कर्मचारी खुल्या अधिवेशनाला महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातील किमान १० हजार कर्मचारी, अभियंते, अधिकारी, कंत्राटी कामगार, सुरक्षारक्षक व अप्रेंटिस उपस्थित होते.

 

 

 

 

अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातून निवडून आलेले ५२० प्रतिनिधी दिनांक ८ व ९ फरवरी २ दिवस प्रतिनिधी अधिवेशनात वीज कंपन्यातील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, केंद्र सरकारने प्रस्तावित केलेला विद्युत कायदा २०२६,केंद्र सरकारने रद्द केलेले २९ कामगार कायदे बहाल करा, नवीन तयार केलेले ४ लेबर कोड रद्द करा,महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेली पेन्शन योजना वीज कर्मचाऱ्यांना लागू करा, महावितरण कंपनीच्या नफ्याच्या क्षेत्रामध्ये खाजगी भांडवलदाराने मागितलेला समांतर वीज वितरणाचा परवाना देऊ नये मुंब्रा, मालेगाव व भिवंडी येथे सुरू असलेल्या खाजगी फेचाईशी रद्द करा, तिन्ही वीज कंपन्यातील हजारो रिक्त जागा भरणे, कंत्राटी आऊटसोर्सिंग कामगारांना ठाणे औद्योगिक न्यायालयाच्या निकालानुसार व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार कायम करून समान काम समान वेतन लागू करणे, महावितरण कंपनीमध्ये करण्यात येत असलेली पुनर्रचना, महानिर्मिती कंपनीचे जलविद्युत प्रकल्प खाजगी भांडवलदारांना देणे,महापारेषण कंपनी मधील २०० कोटीच्या वरील टीबीसीबी प्रकल्प प्रकल्पात खाजगी भांडवलदारांचा शिरगाव या विषयावर व्यापक व विस्तृत चर्चा ३ दिवस अधिवेशनामध्ये होणार आहे.

 

 

 

त्या अधिवेशनाला कॉम्रेड मोहन शर्मा, सी.एन. देशमुख, कृष्णा भोयर, कॉमेड महेश जोतराव,बी.एल. वानखेडे, एस.आर.खतिब, सलाउद्दीन नाकाडे, भीमाशंकर पोहेकर, एन.डी.सनगाळे, अरुण मस्के, बी. एस.काळे, श्रीमंत खरमाटे, सुरेश फराकटे व विलास कोल्हे, कॉम्रेड पी.व्ही.नायडू, सौ.भारती भोयर, सौ.मंजू वर्मा, कॉम्रेड विजय गायकवाड,कॉम्रेड अशोक गलांडे, कॉम्रेड प्रविण माने पाटील, कॉम्रेड संजय सुरवसे, मोहन पाटील वर्मा इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button