crimemaharashtrapoliticalsocialsolapur

NEET परीक्षेत पास करण्यासाठी 1 कोटी रूपयाची फसवणूक करणा-या आरोपीचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळला:- जिल्हा सरकारी वकिल डॉ. प्रदिपसिंग मो. राजपूत

प्रकरणात सविस्तर हकीकत अशी की,

आरोपीने फिर्यादीस NEET परीक्षा व्यवस्थापित करण्याचे आणि सदर परीक्षेत फिर्यादीचे मुलास ६०० पेक्षा जास्त गुण मिळतील, असे खोटे आश्वासन देवून, त्यांचेकडून वेळोवेळी एकूण रक्कम रू.१,१०,००,०००/- घेतलेले होते. तथापि, सदर NEET च्या दोन परीक्षानंतर फिर्यादीच्या मुलाला आरोपीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे गुण मिळाले नसल्याने, फिर्यादीने आरोपीस वरील रकमेची मागणी केली असता, त्याने केवळ त्यांस १० लाख रुपये परत केले होते. आरोपीने उर्वरित रक्कम परत करण्यास टाळाटाळ करून, त्याद्वारे फिर्यादीची आर्थिक फसवणूक केलेली होती.

 

 

त्यामुळे, फिर्यादीने दि.10/12/2025 रोजी आरोपीविरूध्द सदर बझार पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. पोलीसांनी गु.नों.क्र.1026/2025, भा.न्या.सं., 2023 चे कलम 316(2), 318(4), 351(2)

 

 

प्रमाणे नोंद केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी हा फरार असून, त्यादरम्यान त्याने त्याला अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून मा. न्यायालयामध्ये जामीनाचा अर्ज दाखल केलेला होता.

 

 

 

सदर जामीन अर्जास जिल्हा सरकारी वकिल डॉ. श्री. प्रदिपसिंग मो. राजपूत यांनी तीव्र विरोध नोंदवून, असा युक्तीवाद केला की, गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असून, आरोपी हा अद्याप फरार आहे व गुन्हयाचा तपास सुरू आहे. पुढे असा युक्तीवाद केला की, सदर व्यवहारातील उर्वरित रक्कम एक कोटी रूपये अद्याप वसूल झालेली नसून, त्यासाठी आरोपीची पोलीस कोठडीची आवश्यकता आहे. जर आरोपी जामिनावर सुटला तर फिर्यादीचे पुराव्यांशी छेडछाड करण्याची, तो फरार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर होणेबाबत विनंती केली. अभियोग पक्षातर्फे करण्यात आलेला युक्तीवाद ग्राहय धरून, एस.व्ही. केंद्रे, तदर्थ अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब, सोलापूर यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

या प्रकरणात जिल्हा सरकारी वकिल डॉ. प्रदिपसिंग मो. राजपूत यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले, तर आरोपीतर्फे अॅङ  आर. के. सिंग यांनी काम पाहिले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button