maharashtrasocialsolapur

श्री सदगुरू प्रभाकर स्वामी महाराज पुण्यतिथी महोत्सव २ फेब्रुवारीपासून

४ फेब्रुवारी रोजी निघणार भव्य मिरवणूक : भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन

 

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : प्रतिनिधी

श्री सदगुरू प्रभाकर स्वामी महाराज यांचा ६९ वा पुण्यतिथी महोत्सव सोमवार, २ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यानिमित्त सम्राट चौक येथील श्री सदगुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री सदगुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्टचे चीफ ट्रस्टी मोहन बोड्डू यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

 

 

 

श्री सदगुरू प्रभाकर स्वामी महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे गुरुगीता पारायण करण्यात येत असून सोमवार २ फेब्रुवारीपर्यंत दररोज सकाळी ८ ते ९ या वेळेत गुरुगीता पारायण होईल.

 

 

 

शनिवार, दि. ३१ रोजी सायंकाळी ५ ते ७ दरम्यान श्री संत ज्ञानेश्वर महाराज मृदुंगवादन शिक्षण संस्था व संगीत विद्यालयातील ५० बाल वारकऱ्यांचे सामूहिक मृदंग वादन होईल.रविवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता पौर्णिमेनिमित्त पालखी प्रदक्षिणाचा कार्यक्रम होणार आहे.

 

 

 

सोमवार, २ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता गुरुगीता पारायण समाप्ती व श्री प्रभाकर स्वामी महाराजांच्या पिंडीस रुद्राभिषेक व दुपारी तर्पण विधी ट्रस्टी श्री उदय वैद्य यांच्या हस्ते व ब्रम्हावृंदांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होईल. त्याचदिवशी रात्री १०.४५ वाजता सम्राट चौक येथील श्री सद् गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत गुलालाचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार दि. ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत भाविकांना लाडू प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील उपस्थित राहणार आहेत.

 

 

 

तर बुधवार दि ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता श्री सद् गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरापासून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीचे उद्घाटन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते होईल. सम्राट चौक येथून निघालेली ही मिरवणूक पारंपारिक मार्गावरून रात्री ९ वाजता पुन्हा मंदिरात विसर्जित होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टी उदय वैद्य यांनी याप्रसंगी केले.

 

 

 

या पत्रकार परिषदेस श्री सद् गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी बाळकृष्ण शिंगाडे, ट्रस्टी उदय वैद्य, वसंत बंडगर, वामन वाघचौरे, मंदिर ट्रस्टचे सदस्य सर्वश्री रवी गुंड, सम्राट राऊत, सुभाष बद्दूरकर, रमेश देशमुख, मंदिराचे व्यवस्थापक श्री निरंजन दंतकाळे, भजनी मंडळाचे दत्तात्रय कुसेकर, श्री कोथिंबीरे मंदिराच्या प्रसारण विभागाचे प्रमुख परशुराम व्हटकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button