जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यास मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर:- ॲड रितेश थोबडे…

सोलापूर .
विकास सोपान साळुंखे वय 44 राहणार गुंजेगाव तालुका दक्षिण सोलापूर यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या मोहन भानुदास भडकुंबे वय 42 राहणार गुंजेगाव यास *मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर एन लड्डा यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला.*
यात हकीकत अशी की, मोहन भडकुंबे हा गावामध्ये सामाजिक कार्य करीत होता. दिनांक 07/03/ 2025 रोजी विकास साळुंखे ,तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष पवार व इतर हे गुंजेगाव येथील जुन्या पाण्याच्या टाकी शेजारी रस्त्याचा वाद मिटवण्यासाठी जमले होते. त्यावेळी मोहन भडकुंबे व इतर 10 दहा जणांनी विकास साळुंखे यास तू आम्हाला दलित वस्तीतील कामे का देत नाही म्हणून काठीने, लोखंडी रॉडने व गुप्तांग पिरगाळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला अशा आशयाची फिर्याद जखमी विकास साळुंखे यांनी मार्कंडे रुग्णालयात उच्चार घेते वेळेस पोलिसांना दिली. त्यावरून मोहन भडकुंबे व इतरांविरुद्ध मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.
आपणास अटक होऊ नये म्हणून मोहन भडकुंबे याने जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.
मोहन भडकुंबे याने अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात एडवोकेट रितेश थोबडे यांचे मार्फत अर्ज दाखल केला होता.
अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस एडवोकेट रितेश थोबडे यांनी आपले युक्तीवादात जखमी ने झालेल्या जखमान बाबतदिलेला जबाब व मेडिकल सर्टिफिकेट यांच्यामध्ये विसंगती असल्याचा युक्तिवाद मांडाला तो ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी 25000 रुपयाच्या जात मुचुलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला.
अर्जदार आरोपीतर्फे एडवोकेट रितेश थोबडे एडवोकेट सुखदेव भडकुंबे यांनी तर सरकारतर्फे एडवोकेट एस व्ही वाळवे यांनी काम पाहिले.



