maharashtrapoliticalsocialsolapur

होम टू होम प्रचारामुळे प्रभाग क्रमांक ७ मध्ये भाजपने घेतली प्रचारात आघाडी

निराळे वस्ती आणि परिसरातील मतदारांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांचे उत्स्फूर्त स्वागत

सोलापूर

 

यंदाच्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत हाय व्होल्टेज असलेल्या प्रभाग क्रमांक ७ मध्ये भाजपाच्यावतीने होम टू होम प्रचारावर प्रचंड भर दिल्यामुळे भाजप उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. दररोज सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात प्रभाग क्रमांक ७ चा परिसर पिंजून काढण्यासाठी भाजप उमेदवार शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

 

 

प्रभाग क्रमांक ७ मधील लोकमंगल ऑक्सीपार्क, निराळे वस्ती, यश नगर, अभिमानश्री भाग दोन, मनोहर सांस्कृतिक भवन परिसर, रो हाऊस फेज ०१, गोल्डन गेट, उज्वल हाउसिंग सोसायटी परिसर, थोबडे नगर परिसरात प्रभाग क्रमांक ७ चे उमेदवार पद्माकर काळे, उत्तरा बरडे – बचुटे, श्रद्धा पवार, आनंद कोलारकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या भेटी घेत होम टू होम प्रचार केला. यावेळी नागरिकांनी यंदाच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या पाठीशी आम्ही राहणार असून भारतीय जनता पार्टीचे चिन्ह असलेले कमळ हाच उमेदवार समजून सर्व मतदार मतदान करणार आहेत असे आश्वासित केले.

 

 

या पदयात्रेत प्रभाग क्रमांक ७ चे उमेदवार पद्माकर काळे, उत्तरा बरडे – बचुटे, श्रद्धा पवार, आनंद कोलारकर, प्रभाग ०७ भाजपा निवडणूक प्रमुख श्रीकांत घाडगे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते, तसेच विविध सामाजिक संस्था, तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button