मोहोळच्या “बाळराजेंनी” घेतली भाऊंची भेट निमित्त औपचारीक चर्चेचे…
येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने एकत्रित कार्य करू :-बाळराजे पाटील...

सोलापूर
जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते ,लोकनेते साखर कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील हे आज सकाळी सोलापूर शहरात आले असता त्यांनी पार्क चौकातील संतोष पवार यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली या भेटीच्या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांनी त्यांच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल..
यावेळी राज्यातील अनेक घडामोडींसह विविध विषयांवर बाळराजेंनी संतोष पवार यांच्या समवेत विशेष संवाद साधला.येणाऱ्या काळात पक्षवाढीसाठी
व अजित दादांचे बळकट करण्यासाठी शहर – जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने कार्य करू . स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक असो अथवा जिल्हा परिषद यामध्ये राष्ट्रवादीचेच सर्वाधिक उमेदवार उभे करून विजयाचा झेंडा नक्की फडकवू अशी प्रतिक्रिया बाळराजे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

याप्रसंगी मोहोळ बाजार समिती सभापती धनाजी गावडे राष्ट्रवादी युवक मोहोळ तालुका अध्यक्ष राहुल मोरे शशीकांत पाटील अमर चव्हाण सोलापूर शहर जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे महिला अध्यक्ष संगीताताई जोगदनकर युवती अध्यक्ष किरण माशाळकर सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव अल्पसंख्यांक अध्यक्ष अमीर शेख वैद्यकीय मदत कक्ष बसवराज कोळी अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष संजय मोरे मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेहराज आबादिराजे कार्याध्यक्ष विकास हिरेमठ सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अनिल बनसोडे कार्याध्यक्ष शत्रुघ्न कांबळे सेक्रेटरी दत्ता बनसोडे दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर सोशल मिडीया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे उत्तर विधानसभा अध्यक्ष अमोल कोटीवाले कार्याध्यक्ष मनोज शेरला निशांत तारानाईक आदीं पदाधिकारी उपस्थित होते .




