फौजदार चावडी पोलिसांची दमदार कामगिरी बस स्थानकावरील चोरीचा गुन्हा उघडकीस महिला आरोपीस अटक तर हद्दीतून चोरट्यांनी चोरलेली दुचाकी चोरट्यांकडून घेतली ताब्यात…

सोलापूर
दिनांक. १३/११/२०२५ रोजी प्रवाशी महिला नामे जयश्री दत्तात्रय झुंजकर वय ५९ वर्षे, रा.मु.पो. गौडगांव ता. बार्शी, जि. सोलापूर यांनी फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे येवुन गहिवरलेल्या अवस्थेत माहीती दिली की, त्या दि.१३/११/२०२५ रोजी तुळजापूर येथुन धाराशिव ते सोलापूर गाडीत बसुन सोलापूर एस.टी. स्टॅन्ड येथे सकाळी ११.३० वा.चे सुमारास उतरुन दहा पंधरा मिनीट सोलापूर एस.टी स्टॅन्ड येथे थांबल्या. त्यानंतर प्लॅटफॉर्म क्रं.०१ वर ११.४५ वा. ते १२.०० वा.चे सुमारास बेगमपुर येथे जाण्यासाठी सोलापूर ते सांगोला एस.टी.मध्ये बस मध्ये जावुन बसल्या. सदर फिर्यादी महिला हि सीटवर बसल्यावर बसचे तिकीट घेण्यासाठी पर्स मध्ये छोट्या पाकिटातील पैसे काढण्यासाठी त्यांनी पर्सची चैन उडण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांचे निदर्शनास आले की, पर्सची चैन ही उघडीच आहे, त्यावेळी त्यांनी पर्स मध्ये ठेवलेले पैसे व सोन्याचे दागिणे तपासले असता ते मिळुन आले नाहीत. म्हणुन त्यांनी पैसे व सोन्या-चांदीचे दागिण्याचा एस.टी. बस मध्ये शोध घेतला. परंतू सोन्या चांदचे दागिणे मिळुन आले नाहीत. त्यावेळी त्यांची खात्री झाली की, त्यांनी खांद्याला अडवलेल्या पर्स मध्ये ठेवलेले पैसे व सोन्या चांदीचे दागिणे एसटी मध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने पाठीमागुन पर्सची चैन उघडून पर्स मध्ये हात घालुन चोरी केले आहे. या मानसीक धक्यात ही बाब त्यांनी त्यांचे भाऊ व मुलगा यांना सागितली. त्यावेळी त्यांचे भावाने व मुलांने त्यांना पोलीसांबाबत विश्वास दाखवुन त्यांना धीर दिला व तक्रार देण्यासाठी जा असे सांगीतले. दिनांक. १३/११/२०२५ रोजी त्यांनी फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे पोलीसांना माहीती दिली. त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी तक्रारदार यांनी माहीती देताच त्यांनी संवेदनशिलता व कार्यतत्परता दाखवुन सदर महिलेस धीर देवुन त्यांची तक्रार तात्काळ नोंदवुन घेवुन त्याप्रमाणे फौजदार चावडी पोलीस ठाणे गु.र.क्र.८०८/२०२५ भा. न्या. संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षिरसागर यांना पथकासोबत या गुन्हयातील आरोपीत याचा तात्काळ शोध घेण्याबाबत आदेश दिले.
त्याचप्रमाणे या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत व पोलीस निरक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर व त्यांच्या पथकाने तात्काळ या आरोपी महिलेचा गुप्त बातमीदारामार्फत शोध घेत असताना पोलीसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, ” एक अंदाजे २० वर्षे वयाची मुलगी जिने अंगात विटकरी रंगाचा पंजाबी ड्रेस व डार्क चॉकलेटी रंगाचा स्वेटर घातलेला आहे. ति झौपडपट्टी नंबर-०२ सोलापूर येथे राहत असुन तेथुन ति काही वेळाने चोरीचे दागिने विक्री करण्याकरिता पंचकट्टा मार्गे, सराफ कट्टा सोलापूर येथे जाणार आहे.” अशी खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदारा मार्फत प्राप्त झाली आहे. त्याअनुषंगाने सदर बातमीची योग्य ती शहानिशा करुन सदर ठिकाणी जावुन या महिला आरोपीस पोलीसांनी तक्रार प्राप्त झाल्यापासुन अवघ्या बारा तासातच ताब्यात घेतले व तिचे नांव पत्ता विचारले असता तिने आपले नाव-शिल्पा वेळू उपाध्ये वय १९ वर्षे, मुळ रा. बापू नगर, रामपुरे मेडीकल कॉलेज समोर, सेडम रोड, गुलबर्गा राज्य कर्नाटक सध्या रा.घर नं.१०२९ भैरुवस्ती रिक्षा स्टॉप जवळ, शारदा मसुती यांचे घरी भाड्याने, विजापूर नाका, सोलापूर असे सांगीतले. या महिला आरोपी महिला पोलीसांमार्फत कसुन चौकशी करता तीने गुन्हा केल्याची कबुली दिली व तिच्याकडून चोरीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. प्रवाशी महिला नामे-जयश्री दत्तात्रय झुंजकर यांना या बाबत पोलीसांनी तात्काळ माहीती देताच नमुद महिला प्रवाशी यांनीी अश्रु अनावर झाले व त्यांनी पोलीसांचे आभार मानले आहेत.
तसेच सोलापुर आयुक्तलयात, फौजदार चावडी पोलीस ठाणे हददीत दिनांक ०१/११/२०२५ रोजी रात्री ०८.०० वा.च्या सुमारास फिर्यादी नामे-रोहन राजेंद्र पांढरे, वय २८ वर्षे, धंदा- खा. नोकरी, राहणार- ४१७, उत्तर कसबा, सोलापूर, यांनी त्यांच्या राहत्या घराजवळ हॅन्डेल लॉक करून पार्क केली होती. दि.०२/११/२०२५ रोजी सकाळी ०८.३० वा.च्या सुमारास यातील फिर्यादी हे घरातुन उठुन बाहेर आले असता, त्यांनी मो/सा पार्क केलेल्या ठिकाणी दिसली नाही, म्हणुन चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या बाबत पोलीस ठाण्यास माहीती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राउत व पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास हे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख संजय क्षिरसागर व पथक यांनी तात्काळ घटनास्थळास भेट देवून गुन्हयाचा पुढील तपास सुरु केला होता. तपासादरम्यान पोलीसांनी सदर घटनास्थळाचे आजुबाजुचे व रोडचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले तसेच इतर तांत्रीक तपास केला व त्याआधारे तपास करीत असता दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, अंदाजे वय २० ते २५ वर्षे वयाचे दोन संशयीत इसम त्यातील एकाने त्याच्या अंगात मेहंदी कलरचे जॅकेट, व काळया रंगाची जिन्स पॅन्ट घातलेली असुन, दुसऱ्या इसमाने त्याच्या अंगात पांढऱ्या रंगाचा चौकाडा फुल बाहयांचा शर्ट व काळया रंगाची पैन्ट घातलेली असुन ते इसम दोन विनानंबर प्लेट KTM व एक यूनिकॉर्न मोटार सायकलीसह, जुनी मिल कंपाऊंड मधील कडबा मैदान, सोलापूर येथे आंधारात थांबलेले आहेत. त्यावरुन डी.बी. पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर, व पथकाने सापळा लावुन या दोन इसमांना ताब्यात घेताना आरोपीतांनी पळुन जाण्याचा प्रयत्न केला असता पथकाने त्यास शिताफीने पकडुन ताब्यात घेतले. ताब्यात घेततलेले आरोपीत नामे १) विशाल विलास राठोड, वय २५ वर्षे, धंदा-बेकार, राहणार अल्लापूर तांडा, सिंदगी रोड, विजयापूरा, राज्य-कर्नाटक, असे असल्याचे सांगितले, तसेच दुसऱ्या इसमाने त्याचे नाव २) प्रदिप सुभाष राठोड, वय २३ वर्षे, धंदा- खा. नोकरी, राहणार- योगपूर, मुनेश्वर कॉलनी, सिंदगी रोड, विजयापूरा, राज्य-कर्नाटक, असे असल्याचे सांगितले, त्यांना ताब्यात घेण्यात आले होत या आरोपींकडे कौशल्यपुर्ण व शिपाफीने तपास करुन त्यांचे ताब्यातुन या गुन्हयातील चोरीस गेलेले MH-१३-ED-५०५५ या मोटार सायकलसह इतर दोन असे एकुन तीन मोटार सायकल असे एकुण ३,४०,०००/- रू. चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अशाप्रकारे फौजदार चावडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर व पथकाने अवघ्या बारा तासात प्रवाशी महिलेचे चोरी गेलेले सोन्या चांदीचे दागिने परत मिळवुन देवुन तसेच तीन मोटार सायकल हस्तगत करुन मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड केले आणी पोलीसांबददल त्याचे मनात आत्मविश्वास निर्माण करुन उत्कृष्ट कामगीरी केली आहे.
ही कामगिरी ही पोलीस आयुक्त एम. राजकुमार , पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे,सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-१, प्रताप पोमण, वपोनि महादेव राउत, दुय्यम पोलिस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर, पोलिस हवालदार प्रविण चुंगे, पोलिस नाईक शिवानंद भिमदे, पोलिस कॉन्स्टेबल शशिंकात दराडे, विनोद व्हटकर, कृष्णा बडुरे, विनोदकुमार पुजारी, अजय चव्हाण, अमोल खरटमल, ज्ञानेश्वर गायकवाड, तौसिफ शेख,अतिश पाटील, सुरज सोलवनगर ,नितीन मोरे, .पंकज घाडगे, यांनी ही दमदार कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली..



