maharashtrapoliticalsocialsolapur

शहरातील विविध भागांत अजोरा उचल मोहीम; ७३ खेपा करून मोठ्या प्रमाणात स्वच्छता…

 

सोलापूर

सोलापूर – “सोलापूर सुंदर सोलापूर” मोहिमेअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त विणा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज शहरातील अनेक भागांत रस्त्यावर पडलेला अजोरा व बांधकाम अवशेष हटविण्याची मोठी मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत बोरामणी नाका, दयानंद महाविद्यालय परिसर, होमकर नगर, हिप्परगा, हवामान केंद्र, शांती नगर, मौलाना आझाद चौक, IMS शाळा रोड, कुमठेकर हॉस्पिटल–बंधनल मठ मार्ग, कंबर तलाव मैदान, अशोक नगर, शासकीय मैदान परिसर, अमृतनगर बेघर सोसायटी, सोशल कॉलेज रोड, फडकुले सभागृह, मसीहा चौक–वांगी रोड व शानदार चौक–लेप्रसी कॉलनी रोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अजोरा उचलण्यात आला.

या कामासाठी महानगरपालिकेकडून 10 JCB, 12 डंपर अशी मोठी यंत्रसामग्री वापरण्यात आली. दिवसभरात एकूण 73 खेपा करून मोठ्या प्रमाणात अजोरा व कचरा हटविण्यात आला.

या उपक्रमामुळे संबंधित परिसरांतील रस्ते व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ झाली असून नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. महानगरपालिकेने नागरिकांना सार्वजनिक जागेत अजोरा किंवा बांधकाम कचरा न टाकण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia