विठ्ठलराव नारायणराव न्हावकर यांचे निधन…
उद्या १० वाजता लिंगायत स्मशान भूमीत होणार अंत्यसंस्कार...

सोलापूर
विठ्ठलराव न्हावकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, जनसंघाचे संस्थापक सदस्य, भारतीय जनता पार्टीचे संस्थापक सदस्य,शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे सचिव, गणेशोत्सव व नवरात्र मध्यवर्ती महामंडळाचे ज्येष्ठ सदस्य, तसेच टिळक चौक येथील सामाजिक कार्यकर्ते होत.
यवतमाळ येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर व माजी जिल्हा सरकारी वकील संतोष न्हावकर यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे आठ मुले, दोन मुली, दोन जावई,चार नातजावई,वीस नातवंडे व दोन पतवंडे असा परिवार आहे.
त्यांचे आज रात्री 8.30 वा. वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय 88 वर्षे होते.त्यांची अंतयात्रा त्यांचे वसंत विहार येथील राहत्या घरातून उद्या सकाळी 10.00 वाजता निघेल व लिंगायत स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होतील.



