सिंहगड कॉलेज प्राणघातक हल्ला प्रकरणी संजय उपाडे यास जामीन मंजूर:- अँड. संतोष न्हावकर…

सोलापूर-
पुणे-सोलापूर हायवे वरील सिंहगड कॉलेजच्या आवारात क्रुझरमधून 7 ते 8 जणांनी बेकायदेशीर पणे प्रवेश करून महिलेचा विनयभंग करुन, दत्तात्रय नवले यांचे गळ्याला चाकू लावून, कर्मचाऱ्याचे पोटात चाकू खुपसून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संजय ऊर्फ संजीव नागनाथ उपाडे,श्रीकांत माणिक वाघमारे, रोहित सुभाष मंडलिक, अमोघ अरुण कुलकर्णी, दीपक दगडू गरड, सोमेश्वर शशिकांत झाडपिडे,शुभम विष्णु भोईटे, रोहित बाळासाहेब वाडेकर सर्व राहणार बाळे ता.उत्तर सोलापूर यांच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मुख्य आरोपी संजय ऊर्फ संजीव नागनाथ उपाडे याने अँड. संतोष न्हावकर यांचे मार्फत दाखल केलेला जामीन अर्ज मे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री.केंद्रे सो यांनी मंजूर केला.
यात हकिकत अशी की, घटनेचे दिवशी दुपारी 3.30 वाजता फिर्यादी दत्तात्रय ईश्वर नवले हे हॉस्टेल चे समोर थांबून नेहमीप्रमाणे पाहणी करत थांबलेले होते.त्यावेळी एक क्रुजर गाडीतून संजीव उपाडे हा उतरून फिर्यादीस तुला किती वेळा सांगितले आहे की कॅन्टीन बंद कर आणि माझ्या बहिणीला व भावाला येत जाऊ देत नकोस असे म्हणून संजीव हा रागात येवून आता तुझा कार्यक्रम करतो असे ओरडून कॅन्टीनच्या दिशेने जाऊ लागला असतां फिर्यादीने त्यास अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने कमरेचा चाकू काढून फिर्यादीचे गळ्यास लावला त्यावेळी त्यावेळी वाढलेला प्रकार पाहून फिर्यादीने आरडाओरडा केला असता पुरुष कर्मचारी पळत आले आणि ते सोडवण्यासाठी पुढे आले असता संजीव याने पुरुष कर्मचारी प्रकाश माळी यास उद्देशून तू जर पुढे आला तर तूला खलास करतो असे म्हणून त्याचे डाव्या बाजूला पोटात चाकू खुपसला त्यावेळी प्रकाश माळीचे पोटातून खूप रक्त येत असल्याने संजीव उपाडे व ईतर आरोपी हे घाबरून गाडीत बसून पळून जात होते त्यावेळी मेन गेट बंद असल्याने गाडी तेथे सोडून गेट वरुण उद्या मारून पळत असताना कॉलेज मधील कर्मचाऱ्यांनी संजीव उपाडे यास पकडले व त्यावेळी त्याच्या हातातील चाकू तिथेच पडला व पोलीस येईपर्यंत त्याला पकडून ठेवले अशा आशयाची फिर्याद फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे दत्तात्रय ईश्वर नवले यांनी दाखल केली होती. तद्नंतर पोलिसांनी घटनेचा संपूर्ण तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
यात आरोपीतर्फे अँड. संतोष न्हावकर यांनी युक्तिवाद करताना घटनेवेळी आरोपीस झालेल्या जखमांचा पुरावा जाणीवपूर्वक लपविण्यात आल्याचा व फिर्यादी,साक्षीदार यांच्या जबाबातिल विसंगती व पोलिसानी घटनास्थळ वरुण जप्त केलेल्या चाकूवर रक्ताचे डाग नसल्याने फिर्यादीने सांगितलेली घटना संशयास्पद असल्याचे मे. न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.सदरचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीचा जामीनावर मुक्त करणेचा आदेश पारित केला.
यात आरोपी तर्फे अँड. संतोष न्हावकर,अँड राहुल रुपनर अँड वैशाली गुप्ता, अँड मानसी बिराजदार यांनी तर सरकार पक्षातर्फे अँड. अल्पना कुलकर्णी यांनी काम पाहिले.