socialsolapur

श्री राघवेंद्र स्वामी आराधना महोत्सवास २० ऑगस्टपासून प्रारंभ…

हजार भाविक होणार सहभागी : तीन दिवस चालणार श्री राघवेंद्र स्वामींची आराधना

 

श्री राघवेंद्र स्वामींच्या मुरारजी पेठ येथील मठाचा ५१ वे तसेच श्री काळजापूर मारुती मंदिराजवळील मठाचा यंदा ४१वे वर्ष

सोलापूर : प्रतिनिधी

जगद्गुरु श्री मन्मध्वाचार्य मूलमहासंस्थान श्री राघवेंद्र स्वामी मठ मंत्रालय येथील श्री राघवेंद्र स्वामी मठाचे पीठाधिपती श्री श्री १०८ श्री सुबुधेंद्रतीर्थ स्वामीजी यांच्या आज्ञेनुसार तसेच सोलापूर शाखेतर्फे ३५३ वा श्री राघवेंद्र स्वामी आराधना महोत्सव २० ते २२ ऑगस्ट दरम्यान सोलापूरात होणार आहे. श्री राघवेंद्र स्वामी मठाच्या मुरारजी पेठ आणि काळजापूर मारुती मंदिराजवळील शाखांमध्ये तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

श्री क्रोधीनाम संवत्सर श्रावण वद्य प्रतिपदा, द्वितीया आणि तृतीया या तीन दिवसांमध्ये श्री राघवेंद्र स्वामीजींचा आराधना महोत्सव चालणार आहे. श्री राघवेंद्र स्वामींच्या मुरारजी पेठ येथील मठाचा ५१ वा तसेच श्री काळजापूर मारुती मंदिराजवळील मठाचा यंदा ४१ वा वर्धापनदिन साजरा होतो आहे. त्यानिमित्त हजारो भाविक यंदाच्या आराधना महोत्सवास उपस्थित राहणार आहेत.

आराधना महोत्सवापूर्वी सोमवार १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता गोपूजा, ध्वजारोहण, धान्य पूजा, लक्ष्मीपूजा व प्रार्थनोत्सव, स्वस्तिवाचन व महामंगलारतीने महोत्सवातील धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होईल. तसेच श्रावण पौर्णिमेनिमित्त सकाळी ८ वाजता मुरारजी पेठ येथील मठात ऋग्वेदी व यजुर्वेदी नित्य- नूतनोपाकर्म होणार आहे.

मंगळवार २० ऑगस्ट व बुधवार २१ ऑगस्ट रोजी पहाटे ५.३० वाजता सुप्रभात, सकाळी ६ वाजता निर्माल्य विसर्जन, सकाळी ७.३० वाजता अष्टोत्तर पारायण, सकाळी ८ वाजता पाद्यपूजा, सकाळी ९ वाजता पंचामृत अभिषेक, दुपारी १२ वाजता तुलसी अर्चना व नैवेद्य, हस्तोदक, अलंकार, महामंगलारती व तीर्थप्रसाद होणार आहे. तर रात्री ८ वाजता पालखी सेवा, रथोत्सव, स्वस्तिवाचन, महामंगलारती व श्रेय प्रार्थना होणार आहे. बुधवार, दिनांक २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता मध्याराधना प्रयुक्त लक्ष पुष्पार्चन व तुळशी अर्चना करण्यात येणार आहे.

गुरुवार २२ ऑगस्ट रोजी उत्तराराधनेने महोत्सवाची सांगता होईल. या दिवशी पहाटे ५.३० वाजता सुप्रभात, सकाळी ६ वाजता निर्माल्य विसर्जन, सकाळी ७.३० वाजता अष्टोत्तर पारायण, सकाळी ८ वाजता पाद्यपूजा, सकाळी ९ वाजता पंचामृत अभिषेक, सकाळी ११ वाजता महारथोत्सव, तुळशी अर्चना व नैवेद्य, हस्तोदक, अलंकार, महामंगल आरती व तीर्थप्रसाद होणार आहे.
———–
स्वामीभक्तांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मेजवानी

श्री राघवेंद्र स्वामींच्या भक्तांसाठी आराधना महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. राघवेंद्र स्वामी आराधना महोत्सव हा जागतिक स्तरावर साजरा होणारा आराधना महोत्सव आहे .सोमवार दिनांक १९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता विदुषी रसिका कुलकर्णी व सहकाऱ्यांचा मराठी भक्तीगीत कार्यक्रम होणार आहे. मंगळवार २० ऑगस्ट ते गुरुवार २२ ऑगस्टपर्यंत दररोज सकाळी प्रवचन व भजन होईल. तर मंगळवार २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता गीता हेगडे व इतर सहकारी भक्तीगीत कार्यक्रम सादर करणार आहेत. तर बुधवार २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६:३० वाजता गायक प्रशांत देशपांडे व सहकाऱ्यांचा भक्तीगीत कार्यक्रम सादर होणार आहे. हे सर्व कार्यक्रम मुरारजी पेठ येथील मठात होणार आहेत. भाविकांनी या कार्यक्रमांना तन-मन-धनाने सेवेस उपस्थित रहावे, असे आवाहन श्री राघवेंद्र स्वामी मठातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia