प्रभाग 1 मुलभूत सुविधाचा अभाव त्रस्त नागरिकांकडून महानगर पालिकेवर मोर्चा…

सोलापूर
प्रभाग क्रमांक 1 मधिल माता रमाबाई आंबेडकर नगर येथील ड्रेनेज लाईन पाणी पाईप लाईन रस्ते आदी मुलभूत सुविधांपासून गेली अनेक वर्ष पाठपुरावा करून देखील प्रशासन लक्ष देत नाही विषेश म्हणजे या कामाच्या निविदा देखील निघाल्या आहेत तरी प्रत्यक्षात काम होत नाही अधिकारी चाल ढकल करत आहेत त्यामुळेच या भागातील नागरिक त्रस्त झाले असून यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे यांनी प्रशासनाच्या ढिम्म कारभारा विरोधात प्रभाग क्रमांक 1 राष्ट्रवादीच्या वतीने चार हुतात्मा चौक ते सोलापूर महानगर पालिकेवर मोर्चा काढण्यात आला.
हा मोर्चा शहर – जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आला.
सुरुवातीस चार हुतात्मा चौक परिसरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर तसेच चार हुतात्म्यांना अभिवादन करून हा मोर्चा काढण्यात आला.मोर्चा दरम्यान महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
धिक्कार असो धिक्कार असो
ढिम्म पालिकेचा अधिकाऱ्यांचा धिक्कार असो,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे यांनी 1 प्रभाग मधील समस्याचा पाढा वाचुन दाखवला अनेक वर्षांपासून येथील नागरिक नागरी सुविधापासून वंचित आहेत ड्रेनेज लाईन पाणी पाईप लाईन रस्ते या कामाचे निविदा निघाल्या असून देखील प्रत्यक्ष काम सुरू होत नाही त्याचा अनेक वेळे पाठपुरावा करून देखील प्रशासन लक्ष देत नाही म्हणून हा मोर्चाच्या माध्यमातून आमच्या भावना आयुक्त यांच्या पर्यंत पोहचवून कामाला गती मिळेल आशा व्यक्त केली.
- राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यांनी आपल्या मनोगतात बोलताना राज्यात महायुतीची सत्ता आहे सत्ता असून देखील आज प्रभाग क्रमांक 1 मधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना मुलभूत सोयी सुविधांसाठी मोर्चा काढावा लागतो हे काही कामात दिरंगाई आणि हलगर्जीपणा करणारे अधिकारी यांच्यामुळे होत आहे आदरणीय उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कडे या सर्व नागरिकांची मागणी त्यांच्या अडचणी पाठवून संबंधित अधिकाऱ्यांकडून काम करूनच घेऊ
या प्रसंगी कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले , शहर सचिव दत्तात्रय बनसोडे वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी,वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख,मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज आबादीराजे, प्रज्ञासागर गायकवाड , सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे,कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे,कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर , यांच्यासह प्रभाग क्रमांक 1 मधिल विजयानंद भाऊ काळे,रमेश कांबळे,सिद्धार्थ सोनवणे,आनंद इगंळे,दत्ता सोनवणे,भैया ननवरे,शोभाताई सोनवणे, आशिष कदम, चेतन वाघमारे मुन्ना,संचीत कांबळे,संबया, अश्वदीप हार्दिक सरवदे प्रथमेश निम्बर्गीकर सपना ताई कांबळे कल्पना ताई शिंदे लताताई मोरे व असंख्य माता भगीनी होत्या..