वरूण फायनान्शियल सर्व्हिसेसच्या वतीने आयोजित गुंतवणूकदारांसाठी आर्थिक जागृती शिबीरास प्रचंड यश !!…

सोलापूर
-वरूण फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या वतीने शनिवार दिनांक २१/१२/२०२४ रोजी सोलापूर येथील श्रीभोज हॉटेल, टाटा क्रोमा शोरूम वरील मुरारजी पेठ येथे नागरिकांसाठी आर्थिक जागृती शिबीर आयोजित करण्यात आले. दररोज फसवणुकीचे एक नवीन प्रकार घडत आहेत, त्यापासून सुरक्षित कसे राहावे आणि सुरक्षित योजना कसे ओळखावे याविषयी माहिती देताना वरूण फायनान्शिअल सर्विसेसचे संचालक श्री विजयकुमार अंकम यांनी यूट्यूब आणि गूगल सर्च करून गुंतवणूक करणे टाळावे आणि माहिती न घेता गुंतवणूक करणे टाळावे असे सांगितले. योजना उपलब्ध आहेत म्हणून गुंतवणूक न करता, विशिष्ट नियोजन किंवा ध्येय निश्चित करून, दीर्घ काळासाठी गुंतवणूक केल्यास त्याचा चांगला फायदा मिळू शकतो. कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्यासंबंधित सर्व कागदपत्रे वाचावे, असे पुढे बोलताना विजयकुमार अंकम म्हणाले.
प्रत्यक्ष शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक न करता, आपण कष्टाने कमावलेले पैशाचे नियोजन करताना विश्वासू आणि अनुभवी तज्ञ मार्फतीने म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा मिळू शकेल. यावेळी निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाकडून वक्ते श्री संदीप वाघचवरे यांनी म्युच्युअल फंड बद्दल माहिती दिली व ते घेण्याचे फायदे सांगत म्हणाले कि आर्थिक जागरूकता नसल्याने, अजून हि म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटच्या बाबतीत लोकांच्या मनात भीती आहे.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन लक्ष्मण चंदनकेरी यांनी केली. या कार्यक्रमाचे विशेष सहकारी श्याम जक्का, गौतम गड्डम, बबिता भिमनाथ , प्राजक्ता भोसले, श्रुतिका गेंट्याल, अंकिता कोंडले, माधवी येमूल, लक्ष्मण मिठ्ठा, अभिषेक अंकम, विशाल कोंडले, वरुण अंकम आदींनी उपस्थित होते.