किरण बनसोडे यांचा रविवारी पत्रकारिता भूषण पुरस्काराने नागरी सत्कार …

सोलापूर : पत्रकारितेची 22 वर्षपूर्ती झाल्याबद्दल किरण बनसोडे यांचा
रविवार दि. ६ ऑक्टोंबर २०२४ सायंकाळी ५.३० वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, श्री सिद्धेश्वर मंदिर शेजारी, सोलापूर येथे पत्रकारिता भूषण पुरस्काराने नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती गौरव समितीचे अध्यक्ष चांगदेव सोनवणे , सचिव भालचंद्र साखरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार किरण बनसोडे गौरव समितीच्या वतीने हा सोहळा होणार आहे. खा. प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पत्रकार किरण बनसोडे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख हे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ सरवदे , जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख, मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे
प्रशासनाधिकारी संजय जावीर , जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी ,
ज्येष्ठ विचारवंत, दत्ता गायकवाड ,
आर्यनंदी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. राजेश फडकुले, रिपाइंचे (गवई गट) प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे,
रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष के. डी. कांबळे ,
बसपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य ऍड. संजीव सदाफुले, ज्येष्ठ कामगार नेते जनार्दन शिंदे, कामगार नेते अशोक जानराव , सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे,राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सन्मान चिन्ह, मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
या समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गौरव समितीने केले आहे.
या पत्रकार परिषदेस रमेश खाडे, केरबा माने, श्रावण भंडारे , प्रसेनजीत शिंगे, श्रीकांत विभुते आदी उपस्थित होते…