crimemaharashtrapoliticalsocialsolapur

BIG Breaking:- पी.एन.जी ज्वेलर्समध्ये चोरी करणारा, गुन्हेगार अटकेत, त्याचेकडून 71.5 ग्रॅम सोने, 1 किलो चांदी असा 6,87,000/- (सहा लाख सत्त्याएैंशी हजार/-) रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत….

सोलापूर शहर गुन्हे शाखेची कामगिरी....

सोलापूर

दि. 23/01/2025 रोजी सायंकाळी 07:30 वा.चे सुमारास पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स, ध्रुव हॉटेल समोर, पटवर्धन चौक, सोलापूर या नव्याने सुरु झालेल्या, सुवर्णपेढी मध्ये काम करणारा सुपरवायझर, नामे राजकुमार बिराजदार याने सुवर्णपेढीतुन 71.5 ग्रँम सोने व एक किलो चांदी, असा एकुण 6,87,000/-रु. किंमतीचा एैवज, पेढीमध्ये कोणालाही न सांगता, ग्राहकांची बनावट नावाने बुकिंग करुन, कंपनीची फसवणुक करुन, चोरुन नेले आहेत वगैरे मजकुराची फिर्याद, पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सचे मॅनेंजर श्री. राहुल नरेश बाकळे यांनी दिली. सदर घटनेबाबत सदर बझार पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुन्हा रजि नं. 63/2025 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 318(4), 306 प्रमाणे दि. 24/01/2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सपोनि शैलेश खेडकर यांचे पथकातील विनोद रजपुत व उमेश पवार यांनी सदरचा गुन्हा करणारे इसमाबाबत, अत्यंत कमी कालावधीत, कौशल्याने, गोपनीयरित्या माहिती काढली. सुपरवायझर आरोपी नामे राजकुमार बापूराव बिराजदार वय-35 वर्षे, रा. घर नं. 108, हत्तुरे वस्ती, मजरेवाडी, स्वामी विवेकानंद नगर, सोलापूर विमानतळासमोर, सोलापूर यास दि.24/01/2025 रोजीच सायंकाळचे सुमारास, तो चोरी केलेला एैवज विक्री करण्यासाठी जात असताना, सापळा लावून त्यास ताब्यात घेतले. त्याचे अंगझडतीत, त्याने पु.ना.गाडगीळ या दुकानातुन चोरलेले 71.5 ग्रँम सोने (एकुण 13 नग, पिळयाच्या अंगठया) व एक किलो चांदीचा बार (पी.एन.जी असा मार्क असलेले) असा एकुण 6,87,000/-रु. किंमतीचा एैवज सविस्तर पंचनाम्याने हस्तगत केला व सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासुन 12 तासाचे आत उघडकीस आणला.

तसेच सोलापूरचे माजी महापौर स्वर्गीय श्री. महेश विष्णुपंत कोठे यांचे निधन झाल्याने, दि.15/01/2025 रोजी त्यांचे पार्थिव शरिर अंत्यदर्शनासाठी संभाजीराव शिंदे प्रशाला, विडी घरकुल सोलापूर येथील शाळेतच्या मैदानात ठेवण्यात आले होते. सदर ठिकाणी मोठया प्रमाणात लोक जमल्याने गर्दी झाली होती. सदर गर्दीचा फायदा घेवून मोबाईल चोरी करणारे, दोन इसमांबाबत, सपोनि शैलेश खेडकर यांचे पथकातील विनोद रजपुत यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती, सदर बातमी बाबत खात्री करुन, सपोनि शैलेश खेडकर व पथकाने दि.17/01/2025 रोजी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार नामे (1) महंमद इब्राहिम महंमद बागवान वय-28 वर्षे, मुळ रा. बुनकर कॉलनी, बसवकलयाण, जि. बिदर, राज्य-कर्नाटक सध्या रा. मिसगोरी, नया मोहल्ला, मस्जिद जवळ, गुलबर्गा राज्य कर्नाटक (2) महंमद रफिक महंमद इस्माईल सय्यद वय-28 वर्षे, मुळ रा. घर नं. 211, आळंद रोड, अर्शिया कॉलनी जाफराबाद, गुलबर्गा कर्नाटक सध्या रा. अलन चेक पोस्ट, आसरा क्वाटर्स, तोलाबाशा दर्गा, गुलबर्गा राज्य कर्नाटक या आंतरराज्यीय गुन्हेगारांना सापळा लावून ताब्यात घेतले. पथकास त्यांचे ताब्यात, त्यांनी गडडा यात्रा मैदानाजवळील हरिभाई देवकरण प्रशालेचे मागील गेटजवळून चोरलेली एक मोटार सायकल देखील मिळून आली. सपोनि शैलेश खेडकर व पथकाने नमुद दोन आरोपींकडून, एक मोटार सायकल व दोन मोबाईल असा एकुण 53,000/- रुपये किंमतीचा एैवज जप्त केला व एम.आय.डी.सी पो.स्टे कडे दाखल असलेले मोबाईल चोरीचे दोन गुन्हे व सदर बझार पो.स्टे कडे दाखल असलेला मोटार सायकल चोरीचा एक गुन्हा असे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.

तक्रादार नामे प्रभुलिंग राजेंद्र कदम वय-25 वर्षे, व्यवसाय : खाजगी नोकरी रा. घर नं. 80, होटगी रोड, सोलापूर यांची वापरती होंडा शाईन कंपनीची, गुब्बी टाईल्स, औदयोगिक वसाहत, होटगी रोड सोलापूर समोरील पाण्याचे टाकीखाली पार्क केलेली, मोटार सायकल, दि. 13/01/2025 रोजी दुपारी 13:00 वा.ते 16:00 वा.चे दरम्यान, कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली वगैरे फिर्यादीवरुन विजापूर नाका पो.स्टे सोलापूर शहर येथे गुन्हा रजि नं.21/2025 भा.न्या.सं.2023 कलम 303(2) प्रमाणे मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल होता. सपोनि शैलेश खेडकर व त्यांचे पथकातील इम्रान जमादार यांनी तांत्रीक बाबींची पडताळणी करुन, सदर गुन्हयातील मोटार सायकल हस्तगत करुन, मोटार सायकल चोरीचा एक गुन्हा कौशल्याने उघडकीस आणला आहे.

दि. 26/01/2025 रोजी सपोनि शैलेश खेडकर यांचे पथकातील राजकुमार पवार यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे, रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे देवराज जगप्पा जिरले, वय-20 वर्षे, व्यवसाय :- मजूरी सध्या रा.विले पार्ले, मुंबई मुळ रा. बनकनळी ता. शहापूर जि. गुलबर्गा, कर्नाटक यास त्याचे ताब्यातील दोन मोटार सायकलींसह ताब्यात घेवून तपास केला असता, त्याचेकडून दि. 26/01/2025 रोजी दुपारचे वेळेस सोलापूर येथून चोरलेली मोटार सायकल व काही दिवसांपुर्वी गुलबर्गा येथून चोरलेली एक मोटार सायकल अशा दोन मोटार सायकली हस्तगत करुन (1) सदर बझार पो.स्टे गुन्हा रजि नं. 74/2025 भा.न्या.सं.2023 कलम 303(2) व (2) चौक पो.स्टे गुलबर्गा गुन्हा रजि नं. 06/2025 भा.न्या.सं.2023 कलम 303(2) हे दोन मोटार सायकल चोरीचे गुन्हे कौशल्याने उघडकीस आणले आहेत.

 

सपोनि शैलेश खेडकर व पथकाने माहे जानेवारी 2025 मध्ये खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
अ.क्र. पो.स्टे गुन्हा रजि नं व कलम जप्त माल. किंमत.
1 सदर बझार 63/2025 भा.न्या.सं.2023 कलम 318(4), 306 1) 71.5 ग्रॅम सोन्याच्या एकुण 13 नग पिळयाच्या पी.एन.जी हॉलमार्क असलेल्या अंगठया.
2) एक किलो वजनाचा चांदीचा बार. रु. 5,92,000/-

रु. 95,000/-
2 सदर बझार 32/2025 भा.न्या.सं.2023 कलम 303 (2) 1) एक हिरो होंडा कंपनीची पॅशन प्रो मॉडेलची मो.सा. रु. 20,000/-
3 एम.आय.डी.सी. 19/2025 भा.न्या.सं.2023 कलम 303 (2) 1) एक विवो कंपनीच मोबाईल फोन. रु. 25,000/-
4 एम.आय.डी.सी. 20/2025 भा.न्या.सं.2023 कलम 303 (2) 1) एक रेडमी कंपनीचा मोबाईल फोन. रु. 8,000/-
5 विजापूर नाका 21/2025 भा.न्या.सं.2023 कलम 303 (2) 1) एक होंडा शाई न कंपनीची मो.सा. रु. 50,000/-
6 सदर बझार 74/2025 भा.न्या.सं.2023 कलम 303 (2) 1) एक टी.व्ही.एस विगो कंपनीची मो.सा. रु. 25,000/-
7 चौक, गुलबर्गा. 06/2025 भा.न्या.सं.2023 कलम 303 (2) 1) एक काळया रंगाची होंडा डिओ कंपनीची मो.सा. रु. 26,101/-
जप्त मालमत्ता एकुण किंमत. रु. 8,41,101/-

सपोनि शैलेश खेडकर व पथकाने वरील नमुद गुन्हयातील (1) 71.5 ग्रॅम किंमतीच्या एकुण 13 नग पिळयाच्या अंगळया (2) एक किलो वजनाचा चांदीचा बार, (3) चार मोटार सायकली (2) दोन मोबाईल असा एकुण 8,41,101/- रु. किंमतीचा मुददेमाल हस्तगत करुन, मालमत्तेविषयीचे एकुण 07 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

सदरची कामगिरी मा. श्री. एम.राजकुमार, पोलीस आयुक्त, सोलापुर शहर, डॉ. दिपाली काळे, पोलीस उपायुक्त, गुन्हे, श्री.राजन माने, सहा.पोलीस आयुक्त गुन्हे तसेच श्री. सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे स.पो.नि. श्री. शैलेश खेडकर व पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपुत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, सतीश काटे, बाळासाहेब काळे तसेच सायबर पो.स्टे कडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button