महिला व युवतीने कुस्ती क्षेत्राकडे वळावे स्वाती साखरे -अळीमोरे….

महिला व युवतीने कुस्ती क्षेत्राकडे वळावे . स्वाती साखरे ,अळीमोरे. सोलापूर. महिला व युवतीने आधीक प्रमाणात कुस्ती क्षेत्राकडे वळावे असे प्रतिपादन निर्झिरा केअर फाउंडेशनच्या अध्यक्ष स्वाती साखरे अळी मोरे यांनी केले के . सिद्धाराम वी साखरे यांच्या स्मरणार्थ किल्ला भाग आखाडा येथे घेण्यात आलेल्या भव्य कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरणा प्रसंगी त्या बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काशी पिठाचे जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज, नागणसूर मठाचे नीलकंठ शिवाचार्य महाराज चेन्नविर बिराजदार युवराज साखरे पांडुरंग घोडके सागर कत्ते मौला शेख समाधान घोडके हिंदकेसरी दीनानाथ सिंह. मोहन पाटील सोमनाथ अळी मोरे आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना अळले मोरे म्हणाले आहे की सध्याच्या युगात महिलांनी आपले आरोग्य सांभाळीत कुस्तीसह अनेक क्षेत्रात प्राविण्य मिळवून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करता आले पाहिजे . कार्यक्रमाची सुरुवात जगद्गुरु महास्वामीजी यांच्या पाद्यपूजन करण्यात आली. यावेळी कुस्ती स्पर्धेमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या पैलवानांचा सन्मान जगद्गुरु यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक माने यांनी केले तर आभार मोहन पाटील यांनी मांनले