maharashtrapoliticalsocialsolapur

नगरपंचायत‎ निवडणुकीसाठी‎ रणनीतीला वेग; प्रदेशाध्यक्ष सुनील‎ तटकरे यांचे‎ किसन‎ जाधवांनी‎ घेतली भेट….

 

सोलापुर-

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार ) चे‎ प्रदेशाध्यक्ष‎ सुनील तटकरे आणि‎ महिला‎ प्रदेशाध्यक्ष तसेच महिला‎ आयोगाच्या अध्यक्षा रूपाली‎ चाकणकर नगरपंचायत‎ निवडणुकीच्या‎ पार्श्वभूमीवर‎ कुर्डूवाडीत प्रचारसभेसाठी दाखल‎ झाले.‎ या वेळी पक्षाचे‎ प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव‎ यांनी‎ दोन्ही मान्यवरांचे‎ स्वागत‎ केले नगरपंचायतीत‎ राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून‎ यावेत, यासाठी‎ हा‎ दौरा‎ आयोजित करण्यात‎ आला‎ होता. यावेळी पक्षाच्या‎ ग्रामीण‎ व‎ शहरी संघटनांना बळकट करण्यावर‎ भर देण्यात‎ आला.

 

 

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचा‎ निर्णय घेत‎ प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी‎ माहिती दिली‎ की,‎ सोलापूर‎ जिल्ह्याचे सहसंपर्क‎ मंत्री व विधानसभेचे‎ उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे‎ यांचा‎ 27 ते‎ 29 नोव्हेंबरदरम्यान सोलापूर शहर‎ दौरा‎ निश्चित करण्यात आला‎ आहे. या‎ कालावधीत‎ शहर जिल्हाध्यक्ष,‎ शहर‎ कार्यकारिणी,‎ प्रदेश पदाधिकारी‎ आणि कार्यकर्त्यांसोबत बैठका‎ घेऊन महापालिकेत‎ अधिकाधिक नगरसेवक‎ निवडून‎ आणण्याची रणनीती अंतिम केली जाणार‎ आहे.

 

 

 

या दौऱ्याचे काटेकोर नियोजन‎ करण्याच्या‎ सूचना सुनील तटकरे‎ यांनी‎ किसन‎ जाधव यांना‎ देत,‎ पक्ष संघटन‎ मजबूत करण्याला गती मिळाली आहे. याप्रसंगी‎ करमाळ्याचे‎ माजी‎ आमदार‎ संजय‎ मामा‎ शिंदे,‎ ग्रामीण‎ जिल्हाध्यक्ष‎ उमेश‎ पाटील, सोलापूर‎ शहर राष्ट्रवादी सरचिटणीस‎ संतोष उर्फ ऋतिक‎ गायकवाड,‎ कुर्डूवाडी राष्ट्रवादी‎ तालुकाध्यक्ष‎ दत्ता‎ काकडे,‎ पवन बेरे आदींची‎ उपस्थिती‎ होती.‎

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button