maharashtrapoliticalsocialsolapur

दौरा मुख्यमंत्र्यांचा मात्र चर्चा राज्य प्रवक्त्या प्राध्यापक ज्योती वाघमारे यांच्या संपर्क कार्यालयाची…

ज्योती ताईंच्या पाठीशी मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे खंबीरपणे उभे:- आमदार शहाजी बापू पाटील...

सोलापूर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर येणार होते. मात्र या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झाले असल्याने ते या कार्यक्रमाला येऊ शकले नाही . या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. शिंदे गटातील शहाजी बापू पाटील हेही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य प्रवक्त्या प्रा.डॉ.ज्योतीताई वाघमारे यांच्या जग जीवनराम वस्ती परिसरातील जय शंकर तालीम येथे संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते या कार्यालयाचे उद्घाटन आयोजित करण्यात आले होते . मात्र अचानक सकाळी 11:30 वा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा त्यांच्या डोळ्यांच्या आजारांमुळे अचानक रद्द झाला. तसा निरोप राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांना मुख्यमंत्र्यांचे स्वी.सहाय्यक यांच्याकडून फोन द्वारे निरोप मिळाला. मुख्यमंत्री येणार असल्याने प्रा .डॉ. ज्योतीताई वाघमारे व त्यांच्या समर्थकांनी जय शंकर तालीम येथे जोरदार तयारी केली होती. हलग्यांचा कडकडाट , ढोलीबाजा पारंपारिक लेझीम हे मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सज्ज होते. फटाकांची जोरदार आतषबाजी होणार होती. अचानक मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने जय शंकर तालीम परिसरातील नागरिक व शिवसैनिक यांच्यामध्ये निराशा दिसून आली मात्र सांगोल्याचे विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील हे मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले. आ.शहाजी बापूंच्या शुभहस्ते प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन जल्लोषपूर्ण वातावरणात करण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे व तमाम शिवसैनिक उपस्थित होते…
यावेळी शिवसैनिकांनी “महाराष्ट्र का नेता कैसा हो एकनाथ भाई शिंदे जैसा हो”, “एकनाथ भाईंचा विजय असो” , “कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला”, “शिवसेना जिंदाबाद” अशा घोषणा दिल्या . त्यामुळे परिसरात वातावरण निर्मिती झाल्याचा दृश्य प्रामुख्याने पाहायला मिळाल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यालयाच्या उद्घाटनाला येणार असल्याने पोलीस खात्याकडून तगडा बंदोबस्त जय शंकर तालीम परिसरात लावण्यात आला होता. श्वान पथकाने मुख्यमंत्र्यांच्या पूर्वनियोजित दौऱ्यापूर्वी जय शंकर तालीम परिसरात फेरफटका मारला.
आमदार शहाजी बापू पाटील यांच्या शुभहस्ते प्रा डॉ. ज्योती त्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर आमदार शहाजी बापू पाटील यांनी प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे यांच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करत ज्योतीताई या महाराष्ट्राच्या रणरागिणी आहेत शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ आहे सोलापूर शहर जिल्हा राज्यात ज्योती ताईंचा विशेष प्रभाव आहे. महिलांच्या न्याय हक्कासाठी ताई अहोरात्र झटत असतात . त्यांच्या प्रत्येक कार्यात आपण व मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे तसेच सर्व शिवसैनिक पाठीशी एक भाऊ म्हणून खंबीरपणे उभे आहोत आणि राहू अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. आणि आभारपर मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास महिला शिवसैनिक जय शंकर तालीम परिसरातील नागरिक युवक युवती ज्येष्ठ नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती..

चौकट:- मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात शिवसेना शिंदे गटाच्या राज्यप्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या कार्यक्रमास आवर्जून येणार होते मात्र त्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झाल असल्याने ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापुरातील लाडक्या बहिणींची आवर्जून आठवण काढत  स्वतः माझ्याशी संपर्क साधून लाडक्या बहिणीच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले त्यावरून स्वतःच्या प्रकृतीची काळजी न करता जनसेवेसाठी मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे नेहमी सज्ज असतात अशी प्रतिक्रिया व्यक्त केली….

 

सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत

शुभेच्छुक:- प्रियदर्शन साठे { युवासेना जिल्हाप्रमुख}

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button