महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार आण्णासाहेब दादू बनसोडे यांची भीमजयंतीच्या पार्श्वभूमीवर DK,PB,GM या मंडळांसह विविध मंडळांना भेटी….
धावत्या दौऱ्यातही अण्णांनी सोलापूरकरांचे विविध प्रश्न एका फोनवर लावले मार्गी...

सोलापूर भाजपा शहर मध्य विधानसभेच्या मध्यपूर्व मंडल अध्यक्ष श्री.अक्षय अंजिखाने,मध्य-मध्य मंडल अध्यक्ष श्री.नागेश सरगम, मध्य पश्चिम मंडल अध्यक्ष श्री.नागेश खरात यांची नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
शुभेच्छुक :- सोलापूर शहर मध्य विधानसभा पदाधिकारी व सदस्य
सोलापूर
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शहरात सर्वत्र विविध मंडळांच्या जल्लोषात मिरवणुका निघाल्या. लेजर शो,विविध आकर्षक देखाव्यांनी सोलापूरकरांची मने जिंकली. सोलापूर शहर -जिल्ह्यासह लाखो भीमसैनिक सोलापुरात मिरवणुकांमध्ये सहभाग होण्यासाठी दाखल झाले होते.विविध हिंदी – मराठी गाण्यावर तरुणाई ने चांगलाच ठेका धरला.
दरम्यान महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार आण्णासाहेब दादू बनसोडे हे या जयंती सोहळा मिरवणुकी निमित्त सोलापुरात दाखल झाले होते.शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर – जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन भाऊ जाधव यांनी तसेच सर्वच फ्रंटल सेल चे अध्यक्ष कार्याध्यक्ष पदाधिकारी,ज्येष्ठ नेते, आजी माजी नगरसेवक , यांनी आण्णासाहेब बनसोडे यांचे जल्लोषात स्वागत केले.
व जंगी सत्कार केला.यावेळी सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकूणच आढावा घेतला. व एकनिष्ठ कार्यकर्त्याला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवेळी नक्कीच संधी देऊ. कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याच्या सूचना केल्या.
या धावत्या दौऱ्यातही सोलापूरकरांनी प्रलंबित असलेल्या कामांच्या तक्रारी आण्णासाहेब बनसोडे यांच्याकडे केल्या.
या तक्रारी नंतर अण्णांनी तत्काळ संबंधित विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरत प्रलंबित असलेले प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. यावेळी सोलापूर शहर – जिल्हा वासियांनी आण्णासाहेब बनसोडे यांचे विशेष आभार प्रकट केले.
यानंतर भीम जयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकांना आण्णासाहेब बनसोडे यांनी भेटी दिल्या. DK ,PB, GM या मंडळांसह विविध मंडळांना आण्णासाहेब बनसोडे यांनी भेटी दिल्या. यावेळी मंडळांच्या वतीने आण्णासाहेब बनसोडे यांचा टोपी घालून शाल ,पुष्पहार घालून गुच्छ, देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो,जय भीम , आण्णासाहेब बनसोडे आप आगे बढो हम आपके साथ है,एकच वादा अजित दादा, विकासाचा वादा अजित दादा,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अश्या घोषणांनी वातावरण दणाणून सोडले होते.
यावेळी आण्णासाहेब बनसोडे यांनी भीम जयंती निमित्त मिरवणुकीत सहभागी भीमसैनिकांना शुभेच्छा दिल्या. आण्णासाहेब बनसोडे यांच्या समवेत सेल्फी काढण्यासाठी मिरवणुकीत सहभागी भीमसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार,आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी
प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव,कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान, ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा,प्रदेश उपाध्यक्ष आनंद दादा चंदनशिवे, दशरथ कसबे , बाळासाहेब गायकवाड ,प्रदेश चिटणीस शशिकांत बापू कांबळे, जनरल सेक्रेटरी प्रमोद दादा भोसले,माजी नगरसेवक गणेश पुजारी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर,कार्याध्यक्ष चित्रा कदम ,मध्य विधानसभा अध्यक्ष अर्चना दुलंगे,सुरेखा घाडगे, युवक प्रदेश सरचिटणीस महेश कुलकर्णी,अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमीर शेख, सहकार सेल विभाग अध्यक्ष भास्कर आडकी,सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष राजाभाऊ बेळेनवरु , कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे,विनायक रायकर,
OBC सेल विभाग अध्यक्ष अनिल छत्रबंद,कार्याध्यक्ष आयुब शेख,कामगार आघाडी विभाग अध्यक्ष मार्तंड शिंगारे,कार्याध्यक्ष संजय सांगळे, श्यामराव गांगर्डे दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे, VJNT सेल विभाग अध्यक्ष रूपेशकुमार भोसले , वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, शहर सचिव दत्तात्रय बनसोडे,अजिंक्य उप्पीन ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे,वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख, प्रज्ञासागर गायकवाड, यांच्या सह सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते….