सोलापूर मधील सुप्रसिद्ध डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी त्यांच्या निवासस्थानी स्वतः वरच झाडली गोळी घटनेचे कारण अस्पष्ट…
डॉक्टर शिरीष वळसंगकर यांची प्रकृती चिंताजनक ....

घटनास्थळी पोलिस उपायुक्त डॉ विजय कबाडे पथकासह दाखल…
सोलापुरातील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी त्यांच्या निवासस्थानी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास स्वतः च्याच रिव्हॉल्वर मधून गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर वळसंगकर कुटुंबीयांसह सोलापूर शहर चांगलेच हादरले.नातेवाईकांनी डॉक्टर शिरीष वळसंगकर यांना त्यांच्याच रुग्णालयात रामवाडी येथे उपचारासाठी आणले .
डॉ. वळसंगकर यांनी स्वतः वर दोन गोळ्या झाडल्याचे वृत्त आहे .त्यापैकी एक गोळी डॉक्टरांच्या डोक्यातून आरपार गेली आणि बेडरूमधील काचेला लागल्याने काच ही फुटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
डॉ. शिरीष वलसंगकर यांनी सोलापूर येथील डीबीएफ दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समध्ये शिक्षण घेतले आणि सन्मानाने पदवी प्राप्त केली होती. विज्ञानाची पूर्व-पदवी सन्मानाने उत्तीर्ण झाली आणि प्री-प्रोफेशनल सन्मानाने उत्तीर्ण झाली आणि वैद्यकीय शिक्षण सोलापूर येथील डॉ. व्हीएम मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केले. त्यांनी अनुक्रमे शिवाजी विद्यापीठ आणि लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनमधून एमबीबीएस, एमडी आणि एमआरसीपी पदवी मिळवली.
डॉक्टर वळसंगकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. घटने मागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाहीय.या घटनेबद्दल सोलापूर करांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.या घटनेनंतर पोलिस उपायुक्त डॉ.विजय कबाडे यांनी आपल्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी केली . पुढील तपास आता पोलिसांकडून जलद गतीने करण्यात येतोय….