राहुल गांधी यांची चौकशी झालीच पाहिजे……. शहर भाजयुमो

सोलापूर
भाजपा युवा मोर्चा सोलापूर शहराध्यक्ष डॉ. किरण मालक देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गांधी परिवाराने केलेल्या नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाकाची ईडीमार्फत चौकशी झाली पाहिजे यासाठी कन्ना चौक येथे आंदोलन करण्यात आले……
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात हजारो कोटींचा शासकीय जागा स्वतःच्या खाजगी संस्थांच्या नावाखाली लाटून देशातील सामान्य नागरिकांचे फसवणूक केली आहे. याप्रकरणी ईडी चौकशीला सामोर जाण्यासाठी का घाबरत आहेत ? याचा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत असे माजी नगरसेवक वैभव हत्तुरे युवा मोर्चाचे सरचिटणीस रवी कोटमळे यावेळी सांगितले…..
या आंदोलनात अनिल कंदलजी,जय साळुंखे, सिद्धार्थ मंजेली, अजित गादेकर,विनोद कर्ली,नरेंद्र पिसे, शांतेश स्वामी, विशाल शिंदे, शिवशरण साखरे,राहुल घोडके, भार्गव बच्चूयांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी बहुसंख्येने सहभागी होते.