maharashtrapoliticalsocialsolapur

राज्याचे नूतन कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ, दत्तात्रय भरणे, आणि नरहरी झिरवळ यांचा सोलापूर शहर राष्ट्रवादी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करत दिल्या शुभेच्छा…

सोलापूर

सोलापूर-महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतिच सरकार स्थापन झालं. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटी नंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होतं या निवडणुकीमध्ये मतदारांनी महायुतीच्या बाजूने कौल दिला त्यानंतर पाच डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर रविवारी 15 डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनच्या पूर्वसंध्येला नागपूर येथील राजभवन येथे 39 मंत्र्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली.

यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीनं हसन मुश्रीफ, नरहरी झिरवळ आणि दत्तात्रय भरणे यांनी नागपूर येथे पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यात मंत्री पदाची शपथ घेतली शपथविधीनंतर सोलापूर शहर काँग्रेस पार्टीचे पदाधिकाऱ्यांच्या वतीने नूतन कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ, नरहरी झिरवळ आणि दत्तात्रय भरणे यांना सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे,

ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, प्रांतिक सदस्य महेश निकंबे, VJNT सेलचे रुपेश भोसले, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, शहर मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेराज आबादीराजे, सोशल मीडिया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, हुलगप्पा शासम, शहर संघटक माणिक कांबळे, लखन जाधव आदींच्या उपस्थितीत अक्कलकोट निवासी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज यांची प्रतिमा आणि प्रसाद देऊन त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोककल्याणार्थ घेतलेल्या निर्णयामुळेच महायुती सरकारला स्पष्ट बहुमत मिळाले असून येणाऱ्या काळामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचा सर्वांगीण विकास होईल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत सोलापूर शहर जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमी सहकार्याची भावना असल्याचे यावेळी नूतन कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ, नरहरी झिरवळ आणि दत्तात्रय भरणे यांनी यावेळी ग्वाही दिली.

तसेच यावेळी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात नूतन मंत्र्यांनी संतोष पवार आणि किसन जाधव यांच्याशी सविस्तर चर्चा करून सूचना केल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनात्मक बांधणीसाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी संतोष पवार आणि किसन जाधव यांनी नूतन मंत्र्यांना दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button