दिवसा घरफोडी करणारा आंतरराज्यीय गुन्हेगार अटकेत, 110 ग्रॅम सोन्याचे व 113 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त, दिवसा घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस सोलापूर शहर गुन्हे शाखेची दमदार कामगिरी.

सोलापूर
—————————————————————————-
तक्रारदार नामे- श्री. कादर राजूमियॉ शेख, वय- 50 वर्षे, व्यवसाय :- नोकरी, रा. प्लॅट नं. 602, सेंटर पार्क अपार्टमेंट, सिध्देश्वर पेठ, सोलापूर हे शिक्षणाधिकारी पदावर जिल्हा परिषदेत कार्यरत आहेत. त्यांची पत्नी व मुले दि. 10/03/2025 रोजी परगावी गेले होते. कादर शेख हे, दि. 11/03/2025 रोजी सकाळी 10:15 वा.चे सुमारास घरास कुलूप लावून, ते नोकरीचे ठिकाणी गेले. त्यानंतर, सायंकाळी 08:30 वा.चे सुमारास कादर शेख हे कामावरुन परत घरी आले असता, त्यांचे राहते घराचा मुख्य दरवाज्याची कडी व कोयंडा तोडून, कोणीतरी अज्ञात चोरटयाने घराचे बेडरुम मधील कपाटातील सुमारे 10 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व सुमारे 10 तोळे वजनाचे चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुददेमाल चोरुन नेला असल्याचे दिसून आले. त्याबाबत, त्यांचे तक्रारीवरून, जेलरोड पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुन्हा रजि नं. 126/2025 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 305 (ए), 331(3), 331(4) प्रमाणे गुन्हा घरफोडीचा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा घडलेनंतर, गुन्हे शाखेकडील व.पो.नि. सुनिल दोरगे, तसेच, सर्व तपास पथकांनी घटनास्थळी भेट दिली होती. त्याअनुषंगाने, गुन्हे शाखेकडील सपोनि शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी गुन्हयाचे घटनास्थळाचे आजू-बाजूचे परिसराचे बारकाईने निरीक्षक केले. सपोनि शैलेश खेडकर यांचे पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांनी घटनास्थळाचे आजू बाजूचे परिसरातील सी.सी.टी.व्ही कॅमे-या मधील फुटेज बाबतची तांत्रीक माहिती अत्यंत बारकाईने निरीक्षण करुन संकलित केली. त्यानंतर, सपोनि शैलेश खेडकर व पथकास एका संशयीत व्यक्तीचे हालचालीवर संशय निर्माण झाल्याने, त्या संशयीत इसमाबाबत अधिक माहिती संकलित करण्यास सुरुवात केली. त्या संशयीत इसमांविषयी, अधिक माहिती संकलित करीत असताना, सपोनि/खेडकर यांचे पथकास, संशयीत इसम हा, आंतरराज्यीय घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असल्याची देखील माहिती मिळाली.
त्यानंतर, दि.20/03/2025 रोजी, सपोनि/शैलेश खेडकर यांचे पथकास बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, संशयीत इसम नामे- अनिलकुमार मिस्त्रीलाल राजभर, वय-38 वर्षे, रा. ग्रा.पो. बोदरी, ता. केराकत जि. जौनपुर राज्य- उत्तरप्रदेश हा, पुन्हा घरफोडी-चोरी करण्यासाठी सोलापूर शहरात आलेला आहे. त्यामुळे, मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने, नमूद संशयीत इसमाचा सोलापूर शहरात शोध घेतला असता, त्यास हॉटेल ऍ़म्बेसेडर ते प्रभाकर महाराज मंदिराकडे जाणारे रोडवर, युनिटी अपार्टमेंट जवळ, सापळा लावून घरफोडीची करण्याचे साहित्यासह ताब्यात घेतले. नमूद संशयीत इसमाकडे, चौकशी केली असता, त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबूली दिल्याने, त्यास नमुद गुन्हयात तात्काळ अटक केली.
त्यानंतर, अटक कालावधीत सपोनि श्री. शैलेश खेडकर व पथकाने आरोपीकडे अत्यंत कौशल्याने तपास केला असता, त्याने मागील महिन्यात सिन्नर शहर, जिल्हा नाशिक येथे देखील एक घरफोडीचा गुन्हा केल्याची कबूली दिली. नमूद आरोपी याचे ताब्यातुन, सपोनि खेडकर व त्यांचे तपास पथकाने, एकुण 110 ग्रॅम (11 तोळे) वजनाचे सोन्याचे व एकुण 113 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एैवज सविस्तर पंचनाम्याने हस्तगत केला आहे. नमूद आरोपीविरूध्द, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, या राज्यात दिवसा घरफोडीचे 35 गुन्हे दाखल आहेत.
नमूद आरोपीकडून, खालील प्रमाणे 02 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्याची माहिती पुढील प्रमाणे-
अ.क्र. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम जप्त मुद्देमाल
01 जेलरोड गु.र.नं.126/2025 भा.न्या.सं.क. 331(3), 331(4), 305 (ए) 10 तोळे सोने
10 तोळे चांदी
02 सिन्नर, नाशिक जिल्हा गु.र.नं.196/2025 भा.न्या.सं.क. 331(3), 305 (ए) 10 ग्रॅम सोने
13 ग्रॅम चांदी
सदरची कामगिरी, मा. श्री. एम.राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापुर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उपायुक्त, गुन्हे, श्री.राजन माने, सहा.पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे स.पो.नि. श्री. शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार- विजयकुमार वाळके, संदीप जावळे, विनोद रजपुत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, वसीम शेख, इब्राहिम शेख, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, चालक सतीश काटे, बाळासाहेब काळे, आकाश घोलकर तसेच सायबर पो.स्टे कडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे.