देशहित अन् विकासासाठी देवेंद्र कोठे यांना करा विजयी:- निरूपणकार विवेकजी घळसासी…
निरूपणकार विवेकजी घळसासी : देवेंद्र कोठे यांना आशीर्वाद...

.सोलापूर : प्रतिनिधी
देशहित आणि शहराच्या विकासासाठी भाजप आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना विक्रमी मतांनी विजयी करावे, असे आवाहन ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांनी केले.
शहर मध्य विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (ए गट) महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
श्री. घळसासी म्हणाले, सोलापूर शहर मध्य विधानसभेच्या जागेवर भारतीय जनता पार्टीने देवेंद्र कोठे यांच्या रूपाने एक तरुण, तडफदार, प्रखर राष्ट्रभक्ती असलेल्या नेतृत्वाला संधी दिल्याने मनस्वी आनंद झाला आहे.
त्यांनी मागील १० वर्षे नगरसेवक म्हणून केलेल्या जनसेवेच्या कार्याचा प्रभाव खूप आहे. त्यांचा मोठा जनसंपर्क आणि सोलापूर शहराच्या विकासाची स्वप्ने, दूरदृष्टी असणाऱ्या नेतृत्वाला पक्षाने ही संधी दिली आहे. दिल्लीत नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र या समीकरणाप्रमाणे “मुंबईत देवेंद्र, सोलापूर शहर मध्यमधेही देवेंद्र” हे समीकरण विकासाकरिता सोलापूरकरांनी यशस्वीपणे सोलापुरात आणावे. विरोधकांकडून कोणताही संभ्रम पसरविला जाऊ शकतो. परंतु केवळ राष्ट्रहिताकरिता आपण अधिकाधिक मतदानासाठी बाहेर पडले पाहिजे. भरघोस मतदान करून देशहिताकरिता विकासासाठी पाठीमागे न राहता उत्स्फूर्तपणे देवेंद्र कोठे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी सर्वांनी कार्यरत रहावे, असे आवाहनही ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांनी याप्रसंगी केले.